B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’

  • ५ वर्षांत खालिदच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट न केल्यावरून संताप

  • देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खालिदचे समर्थन करणार्‍या विद्यार्थ्याला विरोध केल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पोटशूळ

बी.के. हरिप्रसाद

बेंगळुरू (कर्नाटक) – देहली येथे ‘नीट’ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनात एका विद्यार्थ्याने देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खालिदच्या समर्थनार्थ फलक हातात धरला होता. यावरून अन्य आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यास विरोध केला. पोलिसांनी तो फलक त्वरित आंदोलनस्थळावरून हटवला. तथापि कर्नाटक काँग्रेसने विद्यार्थ्याच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.के. हरिप्रसाद म्हणाले की, वर्ष २०२० च्या देहली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिदला तुम्ही ५ वर्षांपासून कारागृहात ठेवले आहे. त्याच्या विरोधात योग्य आरोपपत्र का प्रविष्ट केले नाही ? हे काय पाकिस्तान आहे का ? सध्याचे सरकार पाकिस्तानच्या पद्धतीचे अनुसरण करत आहे.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकार पाकिस्तानचे धोरण अनुसरत नसले, तरी कर्नाटकातील काँग्रेस सरकार मात्र त्याचे तंतोतंत पालन करत आहे. त्यामुळेच आज तेथील अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर जिल्हाबंदी लादणे, हिंदूंवर आक्रमण करणार्‍या कट्टरतावाद्यांवर योग्य कारवाई न करणे आदी घटना समोर येत आहेत !