पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने झाकोळली गेली हिंदूंची प्राचीन कालमापन पद्धत !

त्रुटीयुक्त पाश्चात्त्य कालमापन पद्धत

१. हिंदु संस्कृतीच्या प्राचीन परंपरेला घाबरून ख्रिस्ती कालगणना हिंदूंवर थोपवणारे इंग्रज !

कालगणनेचे ज्ञान प्राचीन काळापासून प्रत्येक हिंदूला त्याच्या घरात बालपणापासून मिळण्याची व्यवस्था हिंदु धर्माने करून ठेवली आहे ! आजही खेड्यातील वृद्ध सूर्य किंवा चंद्र यांच्या स्थितीवरून वेळ अचूक सांगतात ! हिंदूंच्या कालगणनेचे हे अतिशय परिपूर्ण, अचूक आणि अगाध ज्ञान धर्मग्रंथांत आल्यामुळे जसे ते प्राचीन काळापासून ब्राह्मणांना किंवा ज्ञानी पंडितांना होते, तसे दैनंदिन जीवनात लागणारे काळाचे ज्ञान सर्व वर्णांतील जनसामान्यांना होते, हे विशेष आहे. याचे कारण हिंदूंची परिपूर्ण कालमापन पद्धतीच आहे ! यात पेरणी कधी करायची ? पाऊस कधी येणार ? भरती-ओहोटी आदी अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता.

१८ व्या शतकात इंग्रजांनी गुरुकुलपद्धतीचे शिक्षण बंद केले आणि ‘हिंदूंचे जे जे म्हणून काही आहे, ते ते तुच्छ !’ अशी एक विचारधाराच चालू केली आणि स्वातंत्र्यानंतरही नेहरूंच्या काळात हाच प्रवाह फोफावला. इंग्रजी विद्वानांनी ख्रिस्ती पंथच जुना आहे किंवा ‘सनातन संस्कृती ही अधिक प्राचीन नाही’, असे हे दाखवण्यासाठी हिंदूंच्या धर्मग्रंथांच्या निर्मितीची वर्षही चुकीची सांगून हिंदूंची मोठी दिशाभूल केली.

ख्रिस्ती इंग्रजांनी भारतीय हिंदूंना मोठ्या त्रुटी असलेली, तुलनेत अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेली, सातत्याने पालट होत असणारी पाश्चात्त्य कालगणना अंगीकारण्यास भाग पाडले; इतकेच नव्हे, तर नंतर त्यानुसार वर्षारंभ साजरा करण्यास लावले गेले. त्यामुळे पुढील काही वर्षांत हिंदु जणू ‘गुढीपाडवा’ हा आपला वर्षारंभ आहे, हेच विसरले !

२. इंग्रजी कालमापन पद्धत सदोष असल्याने त्यात पालट होणे

पाश्चात्त्य कालमापनपद्धती तर त्यांना अनेकदा पालटावी लागलेली आहे. पूर्वीपासून प्रचलित असलेले ‘ज्युलियन कॅलेंडर’ वर्ष १५८२ मध्ये अचानकपणे पालटून ‘ग्रेगोरीयन कॅलेंडर’ वापरात आणले गेले; कारण आधीचे ‘कॅलेंडर’ सदोष होते. जुन्या ज्युलियन कॅलेंडरच्याऐवजी ‘पोप ग्रेगरी XIII’ ने कॅथॉलिक देशांत ग्रेगोरियन कॅलेंडर चालू केले. त्ोव्हा गुरुवार, ४ ऑक्टोबरनंतरचा दिवस शुक्रवार, १५ ऑक्टोबर हा होता ! पाश्चात्त्य कॅलेंडरमध्ये दिनांक, मास आणि वर्ष एवढेच समजते, तसेच घड्याळात सेकंद, मिनिटे अन् घंटे.

परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !

१. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी सिद्ध करवून घेतलेले हिंदु कालमापन पद्धतीवरील ग्रंथ !

हिंदु कालमापन पद्धतीचे महत्त्व जाणून शिवाजी महाराजांनी बाळकृष्ण आणि रामकृष्ण संगमेश्वरकर या बंधूंकडून ‘करण कौस्तुभ’ हा ग्रंथ सिद्ध करवून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्याकरवी ‘समयनय:’ हा असाच हिंदु कालमापन शास्त्रावर आधारित ग्रंथ लिहून घेतलेला आहे. हा ग्रंथ तिथीनिर्णय या विषयावर लिहिला गेला आहे.

२. प्रति ३ वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक मासा’मुळे परिपूर्ण झालेली हिंदु कालमापन पद्धत !

भारतीय म्हणजे हिंदु कालमापन पद्धतीमध्ये वर्षाचे बारा मास आणि प्रत्येक मासाच्या पंधरा दिवसांचे दोन पंधरवडे असतात. यात चंद्र आणि सूर्य या दोहोंच्या गतींचा विचार करण्यात आलेला आहे. चंद्राला पृथ्वीभोवती बारा फेऱ्या पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा सुमारे ५० मिनिटे न्यून असतो. हा काळ साचून तीन वर्षांत एका संपूर्ण मासाचा काळ सिद्ध होतो. म्हणून प्रत्येक तीन वर्षांनी आपल्या हिंदु पंचांगात ‘अधिक मास’ येतो. या अधिक मासाच्या संकल्पनेमुळे हिंदु कालमापनपद्धती अधिक अचूक बनली आहे. अधिक मासाच्या योजनेमुळे हिंदूंचे सर्व सण, वार, उत्सव त्या त्या ऋतूंत येतात. (हिजरी कालगणना अत्यंत सदोष असल्याने प्रतिवर्षी रमजान वेगवेगळ्या ऋतूंत येतो.)

आजही ‘ईद’चा चंद्र कधी उगवणार, हे जाणून घेण्यासाठी ‘हिजरी कॅलेंडर’चा (इस्लामी दिनदर्शिका) नाही, तर हिंदु कालमापन पद्धतीचाच आधार घेतला जातो. दाते पंचांग पाहून ईदचा चंद्र केव्हा दिसणार, ते ठरवले जाते.

अमेरिकेने राबवलेल्या अंतराळ मोहिमांपैकी अनेक मोहिमा या त्या दिवशी त्यांच्या भूभागात एकादशी या तिथीच्या दिवशी राबवल्या गेल्याचे लक्षात आले. एकादशी या विशिष्ट तिथीला अंतराळात यान सोडण्यास यानाला अवकाश भेदण्यास अनुकूल अशी स्थिती असते, असे लक्षात आले.

(संदर्भ : संकेतस्थळावरून)

भारतीय हिंदु पंचांगात – पाच अंगे म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग या पाच अंगांची माहिती आहे. चंद्राच्या कला पाहून आणि नक्षत्र पाहून तिथी, मास पक्ष ओळखता येतो, असे शास्त्र आपल्याकडे आहे.

– अनिल (‘व्हॉट्सॲप’वरून साभार)