रामभक्ती म्हणजे काय ?

‘वि’शेषत्वाने ‘श्वास’ घ्यायचा, म्हणजे विश्वास. ‘मी प्रत्येक श्वास या रामभक्तीत जगेन, माझे प्रत्येक स्पंदन या दिव्यत्वाच्या एकतेशी असेल, याचेच नाव रामभक्ती !’ – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मनाचा मळ नाहीसा करणे हेच सर्वोत्तम स्नान !

बुद्धीवाद्यांनी केलेला अपप्रचार : ‘कामक्रोधादी हे आमचे शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचा मळ म्हणून त्याग करणे, हे सर्वस्वी चुकीचे आहे. कामाने आमचे वंशसातत्य राखले आहे. क्रोधाने दुष्टांच्या मनात धाक निर्माण केला आहे. लोभाने आमचे ऐश्वर्य वाढवले आहे.

भारतासमोर असलेला धोका !

गोर्‍या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?

अहंपणा नष्ट करण्यासाठी श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा !

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे, हे समजून समाधानात रहा. वाईटाविषयी कंटाळा किंवा सुखाविषयी आसक्ती नको.

आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा !

आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज विरचित अभंग हे सवर्सामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू यांचे महत्त्व

जिथे प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.

जुन्या वादविवादांचा आणि कलहांचा त्याग करा !

आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल. 

श्रीरामाच्या चरणी शरणागत होऊन केलेली प्रार्थना

रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.

आध्यात्मिकतेचा अभाव वाढत असल्याचे लक्षण !

हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.