स्वामी विवेकानंद यांची शिकवण
भारता, तुझ्यासमोर हाच भयंकर धोका आहे – पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याची एवढी मोहिनी तुझ्यावर पडत आहे की, चांगले काय आणि वाईट काय ? याचा निश्चय आता बुद्धी, विचार, विवेक वा शास्त्रे यांच्या साहाय्याने केला जात नाही. गोर्या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)