परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास असणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

पूर्वी श्रीरामदादा मनमोकळेपणाने बोलत नव्हते; पण मागील १-२ वर्षांपासून त्यांनी यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. मनमोकळेपणाने बोलून दिशा घेणे, हा भाग त्यांनी केला. दादांनी साधना परिपूर्ण होण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. यामुळेच भगवंताने त्यांना त्याच्या जन्मभूमीत जीवनमुक्त केले आहे.

जोगेश्वरी (मुंबई) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आयुष अनिल कदम (वय १४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आयुष कदम हा या पिढीतील एक आहे !

आज्ञापालन करणारे आणि सेवेची तळमळ असलेले धुळे येथील श्री. किशोर अग्रवाल (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. किशोर अग्रवाल यांचे वय ६९ वर्षे असूनही त्यांना साधना आणि धर्मकार्य यांची पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा, गोवा येथील कु. मैत्रेयी मिलिंद पोशे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मैत्रेयी मिलिंद पोशे ही या पिढीतील एक आहे !

आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून तत्त्वनिष्ठतेने साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी सावंत (वय ४१ वर्षे) !

सौ. अश्विनीताई प्रत्येक साधकाचा आढावा इतक्या प्रेमाने आणि कौशल्याने घेते की, त्यातून अन्य साधकांनाही शिकता येते. एखाद्या साधकाने वैयक्तिक किंवा अस्वस्थ करणारे सूत्र सांगितले असल्यास अश्विनीताई तो प्रसंग स्थिर राहून आणि संवेदनशीलतेने हाताळते.

प्रेमळ आणि गुरुदेवांच्या प्रती भाव असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा बेंगळुरू, कर्नाटक येथील कु. हरिकृष्ण नागराज (वय ११ वर्षे) !

आषाढ कृष्ण दशमी (३०.७.२०२४) या दिवशी कु. हरिकृष्ण नागराज याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

स्वतःच्या लेखनशैलीने वृत्तपत्रक्षेत्रात स्थान निर्माण करणारे आणि सेवेची तळमळ असलेले मुंबई येथील कै. जयेश राणे (वय ४१ वर्षे) !

२९.७.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला थेरगाव (जि. पुणे) येथील चि. देवांश निखिल लोंकलकर (वय १ वर्ष) !

आषाढ कृष्ण सप्तमी (२७.७.२०२४) या दिवशी चि. देवांश निखिल लोंकलकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शिकण्याच्या स्थितीत आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या पुणे येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. माधुरी माधव इनामदार (वय ७९ वर्षे) !

काकू प्रतिदिन न चुकता त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा भाषांतर करणार्‍यांच्या गटात पाठवतात. त्यांनी त्यांचा आढावा कधीही चुकवला नाही.

तळमळीने सेवा करणार्‍या मथुरा सेवाकेंद्रातील सनातनच्या साधिका मनीषा माहुर (वय २९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

भाव आणि तळमळ असणारी अन् सर्वांचा आईप्रमाणे सांभाळ करणारी कु. मनीषाताई ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ