उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. देवांश लोंकलकर हा या पिढीतील एक आहे !
आषाढ कृष्ण सप्तमी (२७.७.२०२४) या दिवशी चि. देवांश निखिल लोंकलकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
चि. देवांश निखिल लोंकलकर याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
अ. ‘गर्भधारणेनंतर मी रामरक्षा आणि गणपति स्तोत्र म्हणतांना अन् ‘अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम्’ हे भजन ऐकतांना गर्भ प्रतिसाद देत असे.’ – सौ. मनस्वी लोंकलकर (कोमटी),(चि. देवांशची आई), थेरगाव, पुणे.
आ. ‘पत्नी सौ. मनस्वीला प्रसुतीवेदना होऊ लागल्यावर आम्ही तिला रुग्णालयात घेऊन जातांना वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे उद्वाहन बंद होते. तेव्हा प्रसुतीवेदना होत असूनही सौ. मनस्वी ६ माळे जिन्यावरून उतरून खाली आली. रुग्णालयात गेल्यावर देवाच्या कृपेने शस्त्रकर्म न करता तिची नैसर्गिक प्रसुती झाली.’ – श्री. निखिल लोंकलकर (कोमटी), (चि. देवांशचे बाबा), थेरगाव, पुणे.
२. जन्म ते ३ मास
अ. ‘देवांश २० दिवसांचा झाल्यावर मी त्याला मांडीवर घेऊन श्रीरामाचा पाळणा आणि श्लोक म्हणत असे. तेव्हा तो ते शांतपणे ऐकत असे.
आ. तो हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा करीत असे.’
– सौ. आरती लोंकलकर (कोमटी)(देवांशची आजी (वडिलांची आई)), जळगाव.
३. वय ४ ते ६ मास
अ. ‘काही वेळेला देवांश एका ठिकाणी एकटक बघतो, तेव्हा त्याचे देवाशी अनुसंधान चालू आहे’, असे मला वाटते.’ – सौ. मनस्वी लोंकलकर (कोमटी)
आ. ‘देवांश रडत असतांना त्याला कृष्णाचे चित्र दाखवल्यावर तो शांत होऊन कृष्णाकडे एकटक पहातो.
४. वय ७ ते ९ मास
अ. देवांशला मंदिरात जायला आवडते. मंदिरात आरतीच्या वेळी तो आरतीच्या ठिकाणी घेऊन जायला लावतो. त्यामुळे आम्हाला आरती मिळते. तो मंदिरामध्ये शांत रहातो.’
– श्री. निखिल लोंकलकर (कोमटी)
आ. ‘देवांशला जेवण भरवतांना आरती किंवा भजने लावली, तर तो ते ऐकत व्यवस्थित जेवतो आणि टाळ्या वाजवून आनंदही व्यक्त करतो. त्याला ‘अच्युतम् केशवम् ….’ आणि स्वामी समर्थांचे ‘नि:शंक हो, निर्भय हो, मना रे..’, ही भजने फार आवडतात.’
– सौ. आरती लोंकलकर (कोमटी)
५. वय १० ते १२ मास
अ. ‘प्रतिदिन संध्याकाळी मी देवापुढे दिवा लावून देवांशला मांडीवर घेऊन गणपतिस्तोत्र म्हणते. तेव्हा देवांश शांत बसून स्तोत्र ऐकतो.’ – सौ. मनस्वी लोंकलकर (कोमटी)
आ. ‘देवांशला ताटलीमध्ये काही खाऊ दिला, तर देवांश खाऊ न सांडता व्यवस्थित खातो.’
– सौ. आरती लोंकलकर (कोमटी)
इ. ‘देवांशला त्याने चूक केल्याची जाणीव करून दिल्यावर तो पुन्हा ती चूक करत नाही.’ – कु. वैष्णवी गणेश लोंकलकर (देवांशची चुलत आत्या), जळगाव
‘हे गुरुमाऊली, आपल्याच कृपेमुळे मला हे लिखाण करण्याची संधी मिळून मी ते करू शकले’, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता.’
– सौ. आरती लोंकलकर (कोमटी), जळगाव (२.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |