शारीरिक त्रासातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात असणार्‍या बेळगाव (कर्नाटक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. अर्चना लिमये (वय ६५ वर्षे) !

व्यक्ती आणि परिस्थिती यांना स्वीकारण्याची त्यांच्या मनाची सिद्धता झाली होती. त्यामुळे व्यक्ती अथवा परिस्थिती यांना दोष न देता त्या सकारात्मक राहून उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करत होत्या.

व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मंगळुरू येथील कु. वै.जी. पूर्वी (वय १४ वर्षे) !

श्रावण शुक्ल सप्तमी (१२.८.२०२४) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. पूर्वी हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

इतरांना साहाय्य करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची नवीन पनवेल येथील कु. आर्या तुपे (वय १४ वर्षे) !

आर्या १०० टक्के आज्ञापालन करत असे. ती लिहायला शिकली आणि तेव्हापासून वहीत नामजप लिहू लागली. ती स्वभावदोष सारणीत स्वतःच्या चुका लिहीत असे. गुरुपौर्णिमेच्या वेळी आर्या माझ्या सांगण्यावरून शिक्षकांना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट म्हणून देत असे.

संतांनी सांगितल्यावर नामजप लिहून आणि मोठ्याने करणारे नांदेड येथील कै. सुदर्शनराव गोजे (वय ७४ वर्षे) !

पहिल्या दिवशी पीठ पसरून त्यावर परात झाकून ठेवतात आणि दुसर्‍या दिवशी परात उचलून बघतात. तेव्हा त्या पिठावर ‘ॐ’, ‘स्वस्तिक’, ‘त्रिशुळ’, ‘महादेवाची पिंडी’, अशी शुभचिन्हे दिसली. तेव्हा गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

प्रेमळ आणि श्रीकृष्णाच्या प्रती भाव असलेल्या नागेनहट्टी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. रुक्मिणी कृष्णा पाटील (वय ६२ वर्षे) !

आम्ही (मी आणि माझे यजमान) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. आईंना (सासूबाईंना) ‘आम्ही घरी रहावे, पैसा कमवावा’, असे वाटत नाही. त्या आम्हाला सांगतात, ‘‘घरातील कामे झाली की, तुम्ही आश्रमात जा.’’

साधकांना आधार देणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती दृढ श्रद्धा असलेल्या बेळगाव येथील सौ. अर्चना सुनील घनवट (वय ४३ वर्षे) !

अर्चनाची सद्गुरु स्वाती खाडये यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.

आनंदी स्वभावाचा आणि हिंदु धर्मातील कृतींचे आवडीने पालन करणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा (गोवा) येथील कु. देवांश वसंत सणस (वय ८ वर्षे) !

काल, म्हणजे श्रावण शुक्ल द्वितीया (६.८.२०२४) या दिवशी कु. देवांश सणस याचा आठवा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली देवांशची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवेची तळमळ आणि अनेक सेवांत पारंगत असलेले मथुरा सेवाकेंद्रात रहाणारे श्री. श्रीराम रमेश लुकतुके (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ४३ वर्षे) !

दादांना कधी संघर्षात्‍मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. तेव्‍हा ते सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना शरण जातात आणि सहसाधकांनाही विचारतात. त्‍यामुळे संघर्षात्‍मक प्रसंगांतून त्‍यांना लवकर बाहेर पडता येते.

धर्माभिमानी आणि सेवेची आवड असलेला ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. कृष्‍णा गजानन तांबट (वय १३ वर्षे) !

‘कृष्‍णाच्‍या वडिलांचे एक मित्र अन्‍य पंथियांच्‍या प्रार्थनास्‍थळात जातात’, हे कृष्‍णाला समजल्‍यावर त्‍याने वडिलांच्‍या मित्राचे प्रबोधन केले. तो त्‍याच्‍या मित्रांचेही अन्‍य पंथियांच्‍या उत्‍सवामध्‍ये सहभागी न होण्‍याविषयी प्रबोधन करतो.

साधनेला आरंभ केल्‍यावर सर्वांविषयी प्रेम आणि सेवेतील आनंद अनुभवणारे नाशिक येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) !

‘पूर्वी मला केवळ घरातील लोक आणि नातेवाईक यांच्‍याबद्दल प्रेम वाटायचे. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्‍यावर मला सनातनच्‍या साधकांविषयी प्रेम वाटू लागले. आता मला इतर संप्रदायांतील साधकसुद्धा जवळचे वाटू लागले आहेत…