उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. हरिकृष्ण नागराज हा या पिढीतील एक आहे !
आषाढ कृष्ण दशमी (३०.७.२०२४) या दिवशी कु. हरिकृष्ण नागराज याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘कु. हरिकृष्ण नागराज उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे वर्ष २०१६ मध्ये घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.७.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. हरिकृष्ण नागराज याला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. शिकण्याची वृत्ती
‘हरिकृष्ण नवीन विषय शिकतांना समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारून विषय पूर्णपणे समजून घेतो. घरी एखादी नवीन वस्तू (उदा. गाडी) आणल्यास तो त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतो.
२. प्रेमभाव
त्याला साधकांना पाहून पुष्कळ आनंद होतो. त्याची साधकांना काहीतरी द्यायची इच्छा असते. तो इतरांना साहाय्य करतो. तो स्वतःच्या वस्तू इतरांना देतो.
३. समंजस
त्याला गावी जातांना त्याच्या समवेत त्याचे आई-वडील हवेतच, असे नसते. तो सगळ्यांच्या समवेत आनंदाने रहातो.
४. धर्माचरणाची आवड
तो प्रतिदिन टिळा लावून शाळेत जातो. तो प्रतिदिन देवाची पूजा करतो. तो घरात वडिलांसह अग्निहोत्र करतो.
५. व्यष्टी साधनेचे प्रयत्न
तो भावपूर्ण नामजप करण्याचा प्रयत्न करतो. तो भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करतो. तो अभ्यास करण्यापूर्वी प्रार्थना करतो आणि शेवटी कृतज्ञता व्यक्त करतो.
६. चुकांविषयी संवेदनशील
तो तत्परतेने चुका स्वीकारतो. त्याच्याकडून काही चूक झाल्यास तो क्षमायाचना करतो. तो काही वेळा प्रायश्चित्त घेतो. माझ्याकडून चूक झाल्यास तो मला त्याविषयी सांगतो.
७. संतांप्रती आदरभाव
एकदा तो पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ४८ वर्षे) यांना भेटला. त्याने त्यांच्याकडून ‘चुका कशा लिहायच्या ?’, याविषयी शिकून घेतले. त्यानंतर त्याने चुका लिहिण्यास आरंभ केला. त्याला स्वतःची साधना वाढवण्याची जाणीव झाली. एकदा तो श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटला. तेव्हा त्याची पुष्कळ भावजागृती झाली. त्याविषयी त्याने आम्हाला भ्रमणभाष करून सांगितले. त्यानंतर त्याने नामजप करणे आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवले.
८. गुरूंप्रती भाव
त्याला गुरूंविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) माहिती सांगितल्यावर त्याची भावजागृती होते आणि त्याच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथ मधून मधून पहात असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी त्यांचे दर्शन झाल्यावर हरिकृष्णला पुष्कळ आनंद झाला होता. त्याची पुष्कळ भावजागृती झाली होती. त्याने सांगितले, ‘‘गुरुदेवांना पाहून मी धन्य झालो.’
– सौ. अश्विनी नागराज (कु. हरिकृष्णची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (२०.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |