पुणे येथील ६९ टक्के पातळीच्या सौ. माधुरी माधव इनामदारकाकू (वय ७९ वर्षे) यांच्याकडून मंगळुरू येथील श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. शिकण्याची वृत्ती
‘आवश्यकतेनुसार कन्नडचे मराठी भाषेत आणि मराठीचे कन्नड भाषेत भाषांतर करणार्यांसाठी भाषा शुद्धतेसाठी प्रत्येक आठवड्याला सत्संग घेतला जातो. त्यात साधक त्यांच्याकडून होणार्या चुका सांगतात. व्याकरण आणि मराठीचे कन्नड भाषेत भाषांतर करणे यांमध्ये ‘सुधारणा कशी करावी ?’, हे सांगितले जाते. इनामदारकाकू साधकांच्या चुकांमधून शिकतात आणि अशा चुकांसाठी तात्काळ क्षमायाचना करतात.
२. स्वीकारण्याची वृत्ती
अ. त्या शिकण्याच्या स्थितीत असल्याने त्यांच्यासमोर असलेल्या साधकांच्या आध्यात्मिक पातळीची किंवा वयाची त्यांना पर्वा नसते. अत्यंत नम्रतेने आणि प्रतिमा न जपता त्या इतर साधकांनी सांगितलेले स्वीकारतात.
आ. काकू एका धारिकेवर अनुवादकाचे नाव घालायला विसरल्या होत्या. हे त्यांना सांगताच, त्यांनी ते त्वरित मान्य केले आणि क्षमा मागितली. त्यानंतर कधीही त्यांनी अशी चूक केली नाही.
३. विचारण्याची वृत्ती आणि समयमर्यादेत सेवा पूर्ण करणे
अ. कधी कधी आम्ही २ – ३ साधक त्यांना सेवा पाठवतो, तेव्हा त्या कोणताही ताण न घेता समयमर्यादा आणि प्राधान्य विचारून घेऊन सेवांचे नियोजन करतात अन् प्राधान्यानुसार दिलेल्या सर्व सेवा पूर्ण करतात.
आ. जूनमध्ये मुलांची वैशिष्ट्ये सांगणार्या अनेक धारिका भाषांतरासाठी आल्या होत्या. काकूंनी विश्रांती न घेता त्या सर्व धारिका वेळेत पूर्ण केल्या.
४. सेवेची तळमळ आणि सेवाभाव
अ. काकू त्यांच्याकडील सेवा संपताच त्या सेवा पूर्ण झाल्याची कल्पना देऊन पुढील सेवा मागून घेतात.
आ. काकूंचा सेवाभाव इतका आहे की, जेव्हा त्यांचा संगणक बिघडतो, तेव्हा सेवा करण्यासाठी काकू त्यांच्या भ्रमणभाषवर ‘व्हॉइस टायपिंग’ करून सेवा करतात.
५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अ. काकू प्रतिदिन न चुकता त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा भाषांतर करणार्यांच्या गटात पाठवतात. त्यांनी त्यांचा आढावा कधीही चुकवला नाही.
आ. काही कारणास्तव त्यांना आढावा देणे शक्य नसेल, तर त्या लघुसंदेश करून पूर्वकल्पना देतात.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), मंगळुरू.