प्रेमळ आणि श्रीकृष्णाच्या प्रती भाव असलेल्या नागेनहट्टी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. रुक्मिणी कृष्णा पाटील (वय ६२ वर्षे) !

उद्या श्रावण शुक्ल सप्तमी (११.८.२०२४) या दिवशी सौ. रुक्मिणी कृष्णा पाटील यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. नारायण पाटील यांच्या आई आणि सौ. लक्ष्मी पाटील यांच्या सासूबाई आहेत. त्यांच्या सूनेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. रुक्मिणी कृष्णा पाटील

सौ. रुक्मिणी पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. हसतमुख

‘माझ्या सासूबाई (सौ. रुक्मिणी) नेहमी हसतमुख असतात. ‘त्यांचा चेहरा पडला आहे किंवा त्या मनात काही ठेवून शांत झाल्या आहेत’, असे पहायला मिळत नाही.

सौ. लक्ष्मी नारायण पाटील

२. समंजस

त्या कोणत्याही गोष्टीचा मनात राग धरत नाहीत.

३. त्या दायित्व घेऊन घरातील गोष्टी करतात.

४. प्रेमभाव

मी रुग्णाईत असल्यास त्या मला हवे-नको, ते पहातात. त्यांची माझ्यासाठी अल्पाहार आणि जेवण खोलीत आणून देण्याची सिद्धता असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक सासू म्हणून कधी वेगळेपणा किंवा अधिकारवाणी जाणवत नाही.

५. इतरांना साहाय्य करणे

त्या मला घरकामात साहाय्य करतात. त्या समोर दिसेल, ते काम करतात. त्या रुग्णाईत असल्यासही त्यांना जेवढे जमेल, तेवढे काम करतात. त्या सवलत घेत नाहीत.

६. अपेक्षा नसणे

आम्ही (मी आणि माझे यजमान) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. आईंना (सासूबाईंना) ‘आम्ही घरी रहावे, पैसा कमवावा’, असे वाटत नाही. त्या आम्हाला सांगतात, ‘‘घरातील कामे झाली की, तुम्ही आश्रमात जा.’’

७. अल्प अहं

घरी काही वादाचे प्रसंग झाल्यास त्या स्वतःकडे न्यूनता घेतात.

८. श्रीकृष्णाप्रती भाव

त्यांना काही अडचण आल्यास त्या श्रीकृष्णाला सांगतात. त्यांनी श्रीकृष्णाला सांगितल्यावर त्यांच्या अडचणी सुटतात. त्यांना अनेक वेळा अशा अनुभूती आल्या आहेत.

९. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रती भाव

आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर आमची श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी आमचे बोलणे होऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खोलीतून बाहेर गेल्यानंतर आई आम्हाला म्हणाल्या, ‘‘त्या बसलेल्या आसंदीला स्पर्श करा. त्यात बसा, म्हणजे तुम्हाला त्यांचे चैतन्य मिळेल.’’

‘प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला माझ्या सासूबाईंमधील गुण लक्षात आणून देऊन मला पुष्कळ शिकवले आणि अजूनही शिकवत आहेत’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘गुरुदेवा, त्यांच्यामधील गुण माझ्यात येण्यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी प्रार्थना !’

– सौ. लक्ष्मी नारायण पाटील (सौ. रुक्मिणी पाटील यांची सून, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक