इतरांना साहाय्य करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची नवीन पनवेल येथील कु. आर्या तुपे (वय १४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आर्या विजय तुपे ही या पिढीतील एक आहे !

(वर्ष २०२४ मध्ये कु. आर्या हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे. – संकलक)

श्रावण शुक्ल द्वितीया (६.८.२०२४) या दिवशी कु. आर्या विजय तुपे हिचा १४ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तिच्या आईला तिच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.   

कु. आर्या विजय तुपे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. वय – ५ ते ८ वर्षे

१ अ. साहाय्य करणे : ‘कु. आर्या घरात सर्वांना साहाय्य करत असे. ती मला घरकामांत साहाय्य करायची आणि तिच्या लहान भावाची, कु. कृष्णाची काळजीही घ्यायची.

१ आ. आज्ञापालन करणे : आर्या १०० टक्के आज्ञापालन करत असे. ती लिहायला शिकली आणि तेव्हापासून वहीत नामजप लिहू लागली. ती स्वभावदोष सारणीत स्वतःच्या चुका लिहीत असे. गुरुपौर्णिमेच्या वेळी आर्या माझ्या सांगण्यावरून शिक्षकांना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट म्हणून देत असे.

सौ. नीलिमा विजय तुपे

१ इ. आर्या प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणत असे.

२. वय – ९ ते ११ वर्षे

२ अ. आर्या शाळेत शांत बसे. शाळेचा अभ्यास स्वतःच पूर्ण करत असे. मला अभ्यासासाठी कधी तिच्या मागे लागावे लागले नाही.

३. वय – १२ आणि १३ वर्षे  

३ अ. आर्या मला माझ्या सेवेत साहाय्य करते.

३ आ. आर्या युवा सत्संगाला जाते; पण ती नियमित नामजप करत नाही.

३ इ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी दिलेल्या नामजपामुळे आर्याचे शारीरिक त्रास उणावणे : आर्याला पूर्वी आकडी (फिट्स) येत असे. याविषयी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना कळवल्यावर त्यांनी तिला नामजप करायला सांगितला. तो केल्यानंतर आर्याचे शारीरिक त्रास उणावले. सध्या वर्षभर तिला आकडी आलेली नाही.

३ ई. साधकांच्या सत्संगात आर्याला प्रसन्न वाटणे : वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी आम्ही अन्य साधकांसह पनवेलहून गोव्याला जात होतो. तेव्हा बसमध्ये प्रत्येक साधक स्वतःला आलेल्या अनुभूती सांगत होता. तेव्हा आर्याने ‘‘आज मला पुष्कळ शांत आणि प्रसन्न वाटत आहे’’, असे सांगितले.

४. स्वभावदोष

भावनाशीलता, चिडचिड करणे आणि राग येणे.’

– सौ. नीलिमा विजय तुपे (कु. आर्याची आई), खांदा कॉलनी, नवीन पनवेल, जि. रायगड. (१४.४.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक