(म्हणे) ‘बंगालच्या देवी दुर्गेला (बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना) गोव्यातील भस्मासुरासारख्या सरकारला घरी पाठवण्यासाठी आणणे आवश्यक !’

‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या श्री दुर्गादेवीचा अवमान !

फोंडा येथील कामत रेसिडन्सीमध्ये रहाणार्‍या दोन बहिणींची हत्या

फोंडा येथील सारस्वत बँकेच्या मागे असलेल्या कामत रेसिडन्सी अपार्टमेंट या इमारतीमध्ये रहाणार्‍या दोन बहिणींची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून धारदार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तरित्या मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजन

दसर्‍याच्या निमित्ताने ‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला.

इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग भरवण्यासाठी शिक्षण खात्याकडून मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध

वर्गांचे वेळापत्रक सिद्ध करतांना शाळेत गर्दी होणार नाही, हे पहावे. शाळेचे व्यवस्थापन आवश्यकता भासल्यास, साधनसुविधा असल्यास आणि परिस्थिती अनुरूप दोन पाळ्यांमध्ये वर्ग भरवू शकतात.

गोवा शासन १६ ऑक्टोबरपासून टेलिमेडिसीन सेवा चालू करण्याची शक्यता

या योजनेद्वारे दूरभाषवरूनच रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करून त्यांना उपचाराची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष रुग्ण समोर नसतांनाही या योजनेद्वारे रुग्णावर उपचार करता येतील.

रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात सीमोल्लंघन आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सीमोल्लंघनाचे प्रतीक म्हणून देवालयानजीक असलेल्या डोंगरावरील शमीच्या पेडापर्यंत (पारापर्यंत) श्री रामनाथ मंदिर परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील शाळीग्रामाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

गोवा १० वर्षांनंतर सर्वाधिक ‘फॉरेन्सिक सायन्स’ (न्यायवैद्यक) शास्त्रज्ञ निर्माण करणारे केंद्र बनेल ! – अमित शहा

धारबांदोडा येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापिठाशी (एन्.एफ्.एस्.यू.) संलग्न महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची ! – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोव्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोवा शासन सिद्ध झाले आहे. वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची असल्याचे…

हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी आणि पालक यांची प्रत्यक्ष परीक्षा आणि वर्ग चालू करण्याची मागणी !

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष (ऑफलाईन ) वर्ग चालू करण्यात यावेत, अशी मागणी करत पणजी येथील हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला.

मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हालवण्याचा प्रशासनाचा निर्णय

जिल्हा रुग्णालय चालू झाल्यापासून आता तिसर्‍यांदा हॉस्पिसियो रुग्णालयातील विभाग जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापूर्वी २ वेळा हॉस्पिसियो रुग्णालयातील काही विभाग जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते;