गोवा शासन १६ ऑक्टोबरपासून टेलिमेडिसीन सेवा चालू करण्याची शक्यता

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी – गोवा शासन १६ ऑक्टोबरपासून टेलिमेडिसीन सेवेचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे. या सेवेमुळे नागरिकांना (रुग्णांना) गोवा वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय सल्ल्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या योजनेद्वारे दूरभाषवरूनच रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करून त्यांना उपचाराची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष रुग्ण समोर नसतांनाही या योजनेद्वारे रुग्णावर उपचार करता येतील. ही योजना पूर्वीच्या नियोजनानुसार २ ऑक्टोबरपासून चालू होणार होती.