#Gudhipadva : हिंदूंनो, नववर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेसच का ?
हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !
हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !
‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’, असे धर्मशास्त्र का सांगते, हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत.
‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
इतर पंथियांतील महत्त्वाचे दिवस पृथ्वीवर होऊन गेलेल्या घटनांशी संबंधित आहेत. कांही उदाहरणे पाहूया त्यावरून हिंदु धर्माची महानता आणि भारतियांची ‘इंग्रजांची मानसिक गुलामगिरी’ अन् विचारांचा क्षुद्रपणा लक्षात येईल.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
गुढी लावल्याने वातावरणातील प्रजापति संयुक्त लहरी या कलशरूपी सूत्राच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे, म्हणजे प्रजापति लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति लहरी आपल्याला प्राप्त होतात.
कोणताही धार्मिक विधी करतांना देशकाल कथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेचा संकल्प करण्याआधी देशकाल म्हटले जाते. यातून मनुष्याला एकूण अनंत काळाची व्याप्ती कळून येते. यातून त्याला स्वत:च्या सूक्ष्मत्वाची जाणीव झाल्याखेरीज रहात नाही.
‘हे ईश्वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना !
सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे.