१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
२. १ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते.
गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारी हा नव्हे, तर गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे.’ – (सनातनच्या साधकाला ईश्वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान)
३. गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, उत्सव आणि ते साजरे करण्याची पद्धत’
#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष