#Gudhipadva : जाणून घ्या ! गुढीचे विशेष महत्त्व

गुढी लावल्याने वातावरणातील प्रजापति संयुक्‍त लहरी या कलशरूपी सूत्राच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे, म्हणजे प्रजापति लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति लहरी आपल्याला प्राप्त होतात. प्रजापति लहरींमध्ये प्रजापति लहरींचे ८० टक्के इतके प्रमाण असते, तर सूर्य, यम आणि संयुक्‍त या लहरींचे प्रमाण अनुक्रमे १०, ८ अन् २ टक्के इतके असते. संपूर्ण वर्षभरात इतर कोणत्याही काळात या लहरींचे प्रमाण इतके नसते. प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची जमिनीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे इत्यादी परिणाम होतात.

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष