असे भारतात कधी होणार ?
जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे.
जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे.
काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून होणार्या हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य पहाता २४ ऑक्टोबरला होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक सामना रहित करण्यास बीसीसीआयचा नकार.
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे १० वी इयत्तेत शिकणार्या किरूबाकरण आणि किरूबानंदन या विद्यार्थ्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याने अन् कपाळावर विभूती लावल्याने त्यांना ख्रिस्ती शिक्षक जॉयसन यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली.
फेसबूकने धोकादायक संघटना आणि व्यक्ती यांची ४ सहस्रांहून अधिक जणांची गोपनीय सूची बनवली असून यात ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. या सूचीत पसार आतंकवादी झाकीर नाईक, विविध आतंकवादी कारवायांमध्ये हात असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा समावेश नाही.
कॉमिला (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंडपाची नासधूस करण्यास आली. कुराणाचा अवमान केल्याची अफवा पसरवून हे आक्रमण करण्यात आले.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील गांधीनगरमध्ये असणार्या एका खासगी महाविद्यालयात आयोजित गरब्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या ४ धर्मांधांनी काही मुलांशी बाचाबाची केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटल्याच्या प्रकरणी फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथील भीम आर्मीचा नेता अनिल चौधरी याला अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीने त्याने ट्वीट करून क्षमा मागण्याचा प्रयत्न केला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.