अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याची सिद्धता अंतिम टप्प्यात

फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ४ वाजता होणार्‍या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याची सिद्धता युद्धपातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे.

उमेदवारी मिळण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या समर्थकांकडून मंदिर आणि मशीद येथे प्रार्थना !

काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिलला गोव्यात !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिलला गोव्यात येणार असून याच दिवशी त्यांची फोंडा येथे सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराच्या दृष्टीने ही सभा होणार आहे.

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात गुन्हा नोंद

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

पाकिस्तान सरकारकडून न्यायाधिशांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न !

‘तुम्ही संसदेत गेलात, तर असे लोक तिथे संसदेला संबोधित करतांना दिसतील, जे कालपर्यंत कारागृहात होते आणि जे देशद्रोही आहेत.’ – सरन्यायाधीश उमर अता बंदियाल

१० मे या दिवशी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.

(म्हणे) ‘कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यास मुसलमानांना पुन्हा आरक्षण देऊ !’ – काँग्रेस  

राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे कुणालाही आरक्षण देता येत नसतांना काँग्रेस घटनाविरोधी कृत्य करून हे आरक्षण देणार, असाच याचा अर्थ आहे ! अशा घटनाविरोधी पक्षाला जनता कधीतरी सत्तेवर बसवील का?

भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात हलाल प्रमाणपत्र प्रतिबंधक कायदा करण्याचा उल्लेख करावा ! – हिंदु जनजागृती समिती

केवळ हिंदु जनजागृती समितीच नाही, तर भाजपच्या कर्नाटकातील अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ‘हिंदूंना हलाल मांस खरेदी करण्याची सक्ती का केली जात आहे ?’

मेहबूबा आणि ‘नाटक’बाजी !

हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्‍यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?