(म्हणे) ‘कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यास मुसलमानांना पुन्हा आरक्षण देऊ !’ – काँग्रेस  

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार (मध्यभागी)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने मुसलमानांना मिळणारे ४ टक्के आरक्षण रहित केल्यानंतर काँग्रेसकडून ‘सत्तेवर आल्यास हे आरक्षण पुन्हा देण्यात येईल’ असे आश्‍वासन देण्यात आले आहे.

कर्नाटक सरकारच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा राज्यघटनेत कायदा नाही’; मात्र कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी सरकारचा निर्णय घटनाविरोधी असल्याचा दावा केला आहे. ‘आरक्षणाची वाटणी संपत्तीप्रमाणे करता येईल, असे भाजप सरकारला वाटते; मात्र आरक्षण ही संपत्ती नसून अधिकार आहे. अल्पसंख्याक वर्गासाठीचे ४ टक्के आरक्षण संपुष्टात आणून ते मोठ्या समाजाला द्यावे, असे आम्हाला वाटत नाही. अल्पसंख्यांक आमचे भाऊ आणि आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत’, असेही शिवकुमार म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे कुणालाही आरक्षण देता येत नसतांना काँग्रेस घटनाविरोधी कृत्य करून हे आरक्षण देणार, असाच याचा अर्थ आहे ! अशा घटनाविरोधी पक्षाला जनता कधीतरी सत्तेवर बसवील का?
  • मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसला देशातील जनतेने वर्ष २०१४ पासून केंद्रातून आणि अनेक राज्यांतून सत्तेतून हाकलले असतांना काँग्रेसला अद्यापही सुबुद्धी येत नाही. याचा अर्थ विनाश जवळ आल्यावर बुद्धी चुकीचा निर्णय घेते, असाच होतो !