गोव्यात आता ऑनलाईन पैसे भरून जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘सरकारच्या या निर्णयामुळे नगरपालिका, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर कार्यालये यांवरचा दबाव अल्प  होणार आहे.’’

गोवा शासनाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट 

या वेळी म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ स्थापना करण्याची विनंती केली आणि कर्नाटकचा संमत केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) मागे घेण्याची विनंती केली.

गोवा : पिळर्ण येथे रंग बनवणार्‍या कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग १६ घंट्यांनंतर नियंत्रणात

आतापर्यंत आग विझवण्यासाठी ४ टन ‘फोम’ आणि १२ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. अग्नीशमन दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी दिवसरात्र काम करत होते. त्यांना संरक्षण, नौदल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.

कर्नाटक सुर्ला नाल्याचे पाणी कळसा नाल्यात वळवण्याच्या सिद्धतेत !

सुर्ला नाल्याचे पाणी ‘बारा जणांचा धबधबा’ येथून गोव्यात वहाते. म्हादई अभयारण्यातील वन्यजीव आणि वनसंपदा यांच्यासाठी हा जलस्रोत महत्त्वाचा असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

हत्या आणि आत्महत्या करण्यापेक्षा समुपदेशन घ्या ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

कौटुंबिक कलह, हत्या, आत्महत्या आदी मनाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समाजाला आध्यात्मिक साधना शिकवणे आवश्यक !

म्हादई प्रकरणी शासनाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार

केंद्रीय जलआयोगाने कळसा आणि भंडुरा अहवाला’ला (डी.पी.आर्.) दिलेली मान्यता रहित करावी आणि यासाठी गोवा सरकारने केंद्रावर दबाव आणावा, अशी जनभावना आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गृहमंत्र्यांसमवेत होणारी बैठक महत्त्वाची आहे.

म्हादईप्रश्नी अधिवेशनात पूर्ण दिवस चर्चेसाठी सरकार ठराव मांडणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘राज्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु म्हादईचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संयम बाळगावा लागेल. सरकारच्या विरोधात निदर्शने होत आहेत आणि आम्ही प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.’’

‘पर्पल फेस्ट’चे पणजी येथे उद्घाटन

‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग  व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’

कचरा व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार होत असून २० सहस्र रुपयांचे काम करून ६० सहस्र रुपये घेतले जातात ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तळागाळात फोफावलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना नसलेली शिस्त, हेच कचरा व्यवस्थापन योग्यरित्या न होण्याचे कारण आहे !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातन संस्थेचे मोठे योगदान असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी सनातन संस्थेचे साधक कार्यरत असतात.