हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी

हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्‍या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

बाँबच्या धमकीमुळे मॉस्को येथून येणारे विमान उझबेकिस्तानकडे वळवले

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोवा विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांचा एकमुखी ठराव !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा ठराव रूपांतर करून तो सरकारच्या वतीने मांडण्यात आल्याचे सभागृहात घोषित केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी गटांतील बहुतांश आमदारांनी चर्चेत सहभाग घेऊन म्हादईच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्यावर भर दिला.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा जे.पी.नड्डा

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाचे सक्षम संघटक, नेते आणि सर्व कार्यकर्ते यांचे प्रेरणास्थान आदरणीय जे.पी. नड्डा यांची फेरनिवड झाली आहे.

‘म्हादई वाचवा’ मोहिमेचा आज विर्डी, सांखळी येथे मेळावा

विर्डी, सांखळी येथे १६ जानेवारीला होणार्‍या ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ मोहिमेच्या मेळाव्यासाठी सर्व पर्यावरणवादी, म्हादईप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी राजकीय पक्ष संघटित झाले आहेत. म्हादई वाचवण्यासाठी दुपारी ४ वाजता जनआंदोलनाला प्रारंभ होईल.

म्हादई पाणीतंट्यावर लवकरच उपाययोजना  करू ! – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘हा घाईघाईत सोडवण्याचा प्रश्न नाही. आम्हाला विश्वास आहे की, गोव्यावर अन्याय होणार नाही. आम्ही हा लढा जिंकू. ’’

गोव्यात आता ऑनलाईन पैसे भरून जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘सरकारच्या या निर्णयामुळे नगरपालिका, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर कार्यालये यांवरचा दबाव अल्प  होणार आहे.’’

गोवा शासनाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट 

या वेळी म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ स्थापना करण्याची विनंती केली आणि कर्नाटकचा संमत केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) मागे घेण्याची विनंती केली.

गोवा : पिळर्ण येथे रंग बनवणार्‍या कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग १६ घंट्यांनंतर नियंत्रणात

आतापर्यंत आग विझवण्यासाठी ४ टन ‘फोम’ आणि १२ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. अग्नीशमन दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी दिवसरात्र काम करत होते. त्यांना संरक्षण, नौदल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.

कर्नाटक सुर्ला नाल्याचे पाणी कळसा नाल्यात वळवण्याच्या सिद्धतेत !

सुर्ला नाल्याचे पाणी ‘बारा जणांचा धबधबा’ येथून गोव्यात वहाते. म्हादई अभयारण्यातील वन्यजीव आणि वनसंपदा यांच्यासाठी हा जलस्रोत महत्त्वाचा असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.