प.पू. दास महाराज यांना मिळालेले ‘मारुतीचे चित्र’ आणि ‘प.प. श्रीधरस्वामी यांचे छायाचित्र’ यांच्याकडे पाहून ‘काय जाणवते ?’, हा  प्रयोग करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

‘वर्ष १९६३ मध्ये प.पू. दास महाराज साधनेसाठी हिमालयातील मानससरोवर येथे गेले होते. तिथे त्यांना मारुतिभक्त असलेले एक संत भेटले. त्या संतांना मारुतिरायाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यांनी मारुतिरायाचे रूप हाताने रेखाटून ते चित्र प.पू. दास महाराजांना भेट स्वरूपात दिले. ८.२.२०२० या दिवशी प.पू. दास महाराजांनी ते चित्र रामनाथी आश्रमात दिले आहे.

वर्ष २०१८ मधील अधिक मासात प.पू. दास महाराज वरदपूर (ता. सागर, जि. शिवमोग्गा, कर्नाटक) येथील प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांच्या आश्रमात गेले होते. तेव्हा आश्रमाचे व्यवस्थापक श्री. श्रीधर हेगडे यांनी प.पू. दास महाराजांना प.प. श्रीधर स्वामी यांचे छायाचित्र देऊन त्यांचा सन्मान केला.

प.पू. दास महाराज

९.२.२०२० या दिवशी ‘मारुतीचे चित्र’ आणि ‘प.प. श्रीधरस्वामी यांचे छायाचित्र’ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ठेवण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘साधकांना सूक्ष्मातून काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात १३२ साधकांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना ‘शांत वाटणे, शक्ती जाणवणे, छायाचित्र सजीव वाटणे, तसेच भावजागृती होणे’, अशा प्रकारच्या अनुभूती आल्या. रामनाथी आश्रमातील साधकांना आलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प.पू. दास महाराज यांना एका संतांनी दिलेले मारुतीचे चित्र

१. मारुतीच्या चित्राकडे पाहिल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

१ अ. मारुतीचे चित्र सजीव वाटणे

१. ‘मला मारुतीचे चित्र सजीव वाटले आणि मारुतिरायाची ध्यानावस्था पाहून माझे मन अंतर्मुख झाले.’ – श्री. भूषण केरकर (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

२. ‘मारुतीच्या चित्रात मला जिवंतपणा जाणवला आणि मला प्रत्यक्ष मारुतीचे दर्शन झाले. माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला.’ – कु. रजनीगंधा कुर्‍हे

३. ‘मारुतीची मुद्रा सजीव असून तो प्रत्यक्षातच ध्यानस्थ बसला आहे आणि प्रभु श्रीरामचंद्र दर्शन देत आहे’, असे मला जाणवले.’ – कु. गायत्री जोशी

१ आ. मारुतिरायाच्या जागी प.पू. दास महाराज यांचे दर्शन होणे

१. ‘मला मारुतीचे चित्र सजीव वाटून माझा भाव जागृत झाला. मला मारुतिरायाच्या जागी प.पू. दास महाराज दिसले.’ – कु. राजश्री सखदेव

२. ‘मारुतीच्या चित्रातून भक्तीची स्पंदने प्रक्षेपित होत असून मारुतीच्या जागी ‘प.पू. दास महाराज बसले आहेत’, असे मला वाटले.’ – सौ. विद्या शानभाग

३. ‘मारुतीचे चित्र पहाताक्षणी मला प.पू. दास महाराज यांचे स्मरण झाले, तसेच ‘मारुतिरायाचा श्वास चालू आहे’, असे मला जाणवले.’ – कु. पूजा नलावडे (आताच्या सौ. आनंदी अतुल बधाले) आणि कु. गौरी मुद्गल

४. ‘मला मारुतिरायाच्या जागी प.पू. दास महाराज दिसत होते. त्यांच्या हृदयात परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे मला जाणवले.’ – श्री. रोहित साळुंके

१ इ. मारुतीच्या चित्रातून शक्ती, भाव आणि आनंद जाणवणे

१. ‘मारुतीच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘मला त्याच्या हृदयातून सूर्यासारखा प्रकाश बाहेर पडत आहे आणि तो माझ्याकडे येऊन मला चैतन्य अन् भाव यांनी भारित करत आहे’, असे जाणवले आणि मला चांगले वाटले.’ – कु. भक्ती रोहन मेहता (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के, वय १० वर्षे)

२. ‘मारुतीच्या चित्रातून भाव आणि आनंद यांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.’ – आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले

३. ‘मारुतीच्या चित्रातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि भाव यांची स्पंदने माझा चेहरा अन् अनाहतचक्र येथे जात होती. त्या वेळी माझे ध्यान लागले. मला उत्कट भावाची स्पंदने जाणवून परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण झाले. चित्रातील स्पंदने अधिक सगुण होती आणि ती माझ्या शरीरभर पसरली. त्या वेळी मला प.पू. दास महाराज यांच्या उत्कट भावाचे स्मरण झाले.’ – सौ. शुभांगी सेंगर

वासराला वात्सल्यभावाने कुरवाळतांना प.प. श्रीधरस्वामी

२. प.प. श्रीधरस्वामी यांच्या छायाचित्राकडे पहातांना आलेल्या अनुभूती

२ अ. छायाचित्र सजीव असल्याचे जाणवणे

१. ‘मला छायाचित्र सजीव असल्याचे जाणवून त्यांची प्रीती जाणवली.’ – श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

२. ‘मला छायाचित्र सजीव आहे’, असे जाणवले. ‘प.प. श्रीधरस्वामी वासराला प्रत्यक्ष कुरवाळत आहेत’, हे पाहून माझा भाव जागृत झाला.’ – कु. राजश्री सखदेव

२ आ. छायाचित्राकडे पाहून वात्सल्यभाव जाणवणे

१. ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्यातील वात्सल्यभावामुळे वासरू त्यांच्या कुशीत निर्भय होऊन त्यांचे चैतन्य ग्रहण करत आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. सुनंदा जोशी

२. ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडून वात्सल्यभाव आणि अपार प्रीती यांची स्पंदने माझ्याकडे येत आहेत’, असे मला जाणवले.’ – आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले

३. ‘मला वात्सल्यभाव आणि थंडावा जाणवला. मला त्यांच्या डोळ्यांमध्ये तेज जाणवले. ‘ते छायाचित्र नसून प्रत्यक्ष प.प. श्रीधरस्वामीच तिथे आहेत’, असे मला जाणवले.’ – कु. प्रतीक्षा हडकर

४. ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडे पाहून मला प्रेमभाव जाणवला आणि चित्रातील वासरू अन् त्याचे डोळे सजीव वाटले. माझा श्रीरामाचा नामजप आपोआप चालू होऊन भाव जागृत झाला.’ – कु. गायत्री जोशी

५. ‘छायाचित्र पाहून माझे मन शांत झाले. या छायाचित्रात मला पुष्कळ निर्गुण स्पंदने जाणवली. त्याचा माझ्या मनावर चांगला परिणाम होऊन मला चैतन्य मिळाले. मला भक्ती आणि प्रीती दोन्ही अनुभवता आली !’ – सौ. शुभांगी सेंगर

(सर्व सूत्रांचा दिनांक ९.२.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक