हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या सर्वत्र चालू असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन करणारे प.पू. दास महाराज !

रामनाथी देवस्थान येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले. त्या कालावधीत प.पू. दास महाराज यांना अधिवेशनासंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.

साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा आज उर्वरित भाग पाहू.

पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम आणि तेथील परिसर यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम, तेथील प्रभु श्रीरामाचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर यांचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

गौतमऋषि आणि प.पू. भगवानदास महाराज यांची साधना अन् कठोर तपश्चर्या यांमुळे पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमाची महती

कोणाला बाहेरची बाधा झाली असेल किंवा शारीरिक त्रास, त्वचा विकार आणि मानसिक त्रास होत असेल, तर येथील झर्‍याच्या पाण्याचा तीर्थ म्हणून वापर करतात आणि लोकांना त्याची प्रचीतीही येते.

श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७४ वर्षे) !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन (११.८.२०२२) या दिवशी पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त श्रीमती वंदना करचे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प.पू. दास महाराज यांचे वडील प.पू. भगवानदास महाराज आणि आई पू. रुक्मिणी नाईक यांना नागदेवतेच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

आश्रमाभोवती नागदेवता फिरत असतात. त्यांच्या अंगावर सोनेरी केस आहेत. केस दिसतच नाहीत, तर ‘सोन्याच्या काड्या लावल्या आहेत’, असे दिसते. मी वर्ष १९६१ मध्ये गौतमारण्य आश्रमात आलो. तेव्हापासून आजपर्यंत ६१ वर्षे झाली; परंतु नागदेवतेने कुणालाही कधीच कसला त्रास दिला नाही.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे) यांनी प.पू. दास महाराज यांची अनुभवलेली कृपा !

‘१५.७.२०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता मला पुष्कळ त्रास होत होता, तसेच माझ्या जिवाची तगमग होत होती. मी प.पू. दास महाराज यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी कपाटातून परम पूज्यांचे मोठे छायाचित्र काढून मला दिले आणि त्यांना मनोमन प्रार्थना करायला सांगितली.

‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली सूत्रे

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे निधन झाले. २५.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

वर्ष २००२ मध्ये धामसे (गोवा) येथे झालेल्या ‘पंचमुखी हनुमत्कवच’ यज्ञाच्या वेळी गुरुदेवांच्या पादुका बनवून घेतांना आणि बनवल्यावर आलेल्या अनुभूती

वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाचा संकल्प केला होता. यातील १२ व्या यज्ञाच्या वेळी साधिका सौ. मंगला मराठे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

पानवळ-बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या गौतमारण्य आश्रमातील श्रीराम मंदिराचा जीर्णाेद्धार झाल्यापासून हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीवर होत असलेला किरणोत्सव !

पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील मारुतिरायांच्या मूर्तीवर पडणारे किरण उगवत्या सूर्यनारायणाचे आहेत. ते प्रथम हनुमंताच्या मुखमंडलावर पडतात आणि नंतर हळूहळू चरणांकडे जातात.