युक्रेनच्या प्रमुख कमांडरला पदावरून हटवले !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेंस्की यांनी त्यांच्या सैन्याच्या जॉइंट फोर्सचे कमांडर मेजर जनरल एडवर्ड मिखाइलोविच मोसकालोव यांना पदावरून हटवले आहे. त्यांची गेल्या वर्षी मार्चमध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना पदावरून का हटवण्यात आले, याचे कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही.

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा शिकायला हवा ! – उद्योगपती नारायण मूर्ती

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा  शिकण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९४० पर्यंत भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास समान होता; पण त्यानंतर चीनचा विकास झपाट्याने झाला आणि आज त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या ६ पट आहे.

देशातील अमर्याद भूमी बळकावण्‍याचा अधिकार देणारा वक्‍फ कायदा त्‍वरित रहित करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांवर कारवाई करा !

वाद चव्‍हाट्यावर !

स्‍वतःचे खरे दायित्‍व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्‍यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्‍या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !

परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.

बारामती येथील काकांनी राज्‍यात भ्रष्‍टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत ! – आमदार प्रशांत बंब

बंब पुढे म्‍हणाले की, गंगापूर साखर कारखान्‍याच्‍या निवडणुकीत १ सहस्र मतांच्‍या भेदाने आमच्‍या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही सहस्रो मतदारांनी विश्‍वास ठेवल्‍याविषयी मी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो.

अटकेतील आरोपी आमदार अब्बास अन्सारी याच्यासह कारागृहात मौज करणार्‍या त्यांच्या पत्नीला अटक !

कारागृहात अटकेत असणार्‍याला सर्व प्रकारची अनुमती घेऊन अंतर ठेवून काही मिनिटांसाठी भेटण्याचा नियम असतांना आमदाराची पत्नी थेट त्यांच्या समवेत कशी सापडते, याचे उत्तर जनतेलाही ठाऊक आहे !

नागपूर ‘बायपास’वर ट्रकचालकांकडून प्रवेश शुल्‍कच्‍या नावावर अवैध वसुली !

उपप्रादेशिक निरीक्षकासह २ दलालांना अटक !

भ्रष्‍टाचार्‍यांचे निर्दोषत्‍व आणि मानहानी !

देशात ‘भ्रष्‍टाचार हा शिष्‍टाचार’, अशी स्‍थिती निर्माण होणे, हे भारतियांना लज्‍जास्‍पद !

भ्रष्‍टाचार संपवणे आवश्‍यक !

भ्रष्‍टाचाराने शासकीय यंत्रणा इतकी पोखरली गेली आहे की, ‘भ्रष्‍टाचारमुक्‍त विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. ‘भ्रष्‍टाचार हाच शिष्‍टाचार झाला आहे’ आणि हे देशासाठी अत्‍यंत घातक आहे….