गोवा : अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वारंवार तक्रार करूनही अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष होणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे कि त्यांचे अवैध कृत्य करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराच्या मुलाला ४० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

प्रशांत यांच्या घरी ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !

सरकारी कार्यालयांत भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील भीषण स्‍थिती दर्शवणारे काही प्रसंग !

‘मी जानेवारी २०२२ मध्‍ये नाशिक जिल्‍ह्यात एका भूमीच्‍या कामाच्‍या संदर्भात एका अधिवक्‍त्‍यांना भेटलो. तेथे दोन व्‍यक्‍ती आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी घडलेले प्रसंग पुढे दिले आहेत.

भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील कटू अनुभव कळवा

शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्‍टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्‍यक आहे.

युक्रेनच्या प्रमुख कमांडरला पदावरून हटवले !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेंस्की यांनी त्यांच्या सैन्याच्या जॉइंट फोर्सचे कमांडर मेजर जनरल एडवर्ड मिखाइलोविच मोसकालोव यांना पदावरून हटवले आहे. त्यांची गेल्या वर्षी मार्चमध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना पदावरून का हटवण्यात आले, याचे कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही.

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा शिकायला हवा ! – उद्योगपती नारायण मूर्ती

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा  शिकण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९४० पर्यंत भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास समान होता; पण त्यानंतर चीनचा विकास झपाट्याने झाला आणि आज त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या ६ पट आहे.

देशातील अमर्याद भूमी बळकावण्‍याचा अधिकार देणारा वक्‍फ कायदा त्‍वरित रहित करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांवर कारवाई करा !

वाद चव्‍हाट्यावर !

स्‍वतःचे खरे दायित्‍व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्‍यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्‍या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !

परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.

बारामती येथील काकांनी राज्‍यात भ्रष्‍टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत ! – आमदार प्रशांत बंब

बंब पुढे म्‍हणाले की, गंगापूर साखर कारखान्‍याच्‍या निवडणुकीत १ सहस्र मतांच्‍या भेदाने आमच्‍या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही सहस्रो मतदारांनी विश्‍वास ठेवल्‍याविषयी मी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो.