अम्‍लपित्ताच्‍या त्रासासाठी जीवनशैलीत पालट करणे अत्‍यावश्‍यक !

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्‍हणजे रुग्‍ण आपल्‍या आहार विहारामध्‍ये काहीच पालट करत नाही. त्‍यामुळे अम्‍लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्‍यासच अम्‍लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्‍लपित्त व्‍हायला लागते !

सूज आणि ठणका यांवर उपयुक्‍त एरंडेल तेल

‘काही वेळा काटा लागल्‍यावर त्‍या भागाला सूज येते आणि तेथे ठणकू लागते. गळू किंवा केसतोड झालेला असतांनाही सूज आणि ठणका असतो. अशी सूज आणि ठणका असतांना एरंडेल तेल पुष्‍कळ चांगले काम करते.

शिळी पोळी खाऊन ‘ब १२’ जीवनसत्त्व वाढते का ?

प्रतिदिन शिळे खाणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले नव्‍हे. नियमितपणे शिळे अन्‍न खाल्‍ल्‍याने शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) बिघडतो आणि यामुळे अनेक रोग होऊ शकतात.

झोप (निद्रा) : शरिराचा एक आधारस्‍तंभ !

आयुर्वेदामध्‍ये शरिराचे ३ आधारस्‍तंभ सांगितले आहेत आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ! आतापर्यंतच्‍या लेखांमधून आपण प्रकृतीनुसार आहार कसा घ्‍यावा ? जेवणाचे नियम काय आहेत ?

सकाळी उठून रस, लिंबू पाणी इत्‍यादी पिणे टाळावे !

‘प्रतिदिन सकाळी अमुक अमुक रस प्‍या’, ‘लिंबू पाणी प्‍या’ यांसारखे संदेश सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून आयुर्वेदाच्‍या नावाखाली प्रसारित होत असतात. बरेच जण असे करतही असतात. ‘हे आयुर्वेदिक उपचार आहेत.

‘डोळे येणे’ या विकारावर घरगुती उपचार

डोळ्‍यांची आग होत असल्‍यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्‍या चकत्‍या कापून त्‍या स्‍वच्‍छ धुतलेल्‍या रुमालाने डोळ्‍यांवर बांधाव्‍यात. काकडीप्रमाणे शेवग्‍याची वाटलेली पानेही डोळ्‍यांवर बांधता येतात.

चिखल्‍यांवर सोपा घरगुती उपाय

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२२ ‘पावसाळ्‍यात अधिक काळ पाण्‍यात पाय भिजल्‍यावर काही जणांना पायांच्‍या बोटांच्‍या बेचक्‍यांत एकप्रकारचा त्‍वचाविकार होतो. या विकाराला ‘चिखल्‍या’ म्‍हणतात. यामध्‍ये बोटांच्‍या बेचक्‍यांत भेगा पडणे, तेथील त्‍वचा ओलसर राहून तिला दुर्गंध येणे, खाज येणे, असे त्रास होतात. यावर पुढीलप्रमाणे सोपा उपाय करून पहावा. प्रतिदिन रात्री झोपण्‍यापूर्वी पाय साबण लावून स्‍वच्‍छ धुवावेत … Read more

बहुगुणी अमृतवेल – गुळवेल !

अशी ही बहुगुणी गुळवेल आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत लाभदायी आहे. खरोखर ही नावाप्रमाणेच असणारी अमृतवेल फार गुणकारी आहे.

अंगातील थंडी घालवणारा आल्‍याचा किंवा सुंठीचा काढा

पावसाळ्‍यात किंवा हिवाळ्‍यात वातावरणात थंडी अधिक असतांना बाहेरून घरात आल्‍यावर कधीतरी अचानक पुष्‍कळ थंडी वाजू लागते. अशा वेळी अंगात गरमी उत्‍पन्‍न होण्‍यासाठी सुंठीचा किंवा आल्‍याचा काढा प्‍यावा.

वाळूच्‍या पोटलीने (गाठोड्याने) शेकणे

दोन्‍ही हातांच्‍या ओंजळीत मावेल एवढी वाळू तव्‍यावर किंवा कढईत गरम करावी आणि ती गरम केलेली वाळू एखाद्या सुती कपड्यावर ओतून कपडा बांधून पोटली बनवावी.