प.पू. दास महाराज यांच्याविषयी अपार भाव असलेले त्यांचे भक्त श्री. रमाकांत नेवाळकर !

मला प.पू. दास महाराज यांचे (प.पू. बाबांचे) पायात खडावा घातलेले आणि त्यांची आई पू. रुक्मिणी भगवानदास नाईक यांचे दर्शन होते. प.पू. बाबांनी बांदा येथे राममंदिर बांधले आहे. तिथे पुष्कळ लोक दर्शनासाठी येतात.

प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे

सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.

‘सेवा हा गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, या भावाने सेवा करणार्‍या सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजी !

पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजींच्या तिसऱ्या मासिक श्राद्धानिमित्त पू. आजींचे कुटुंबीय आणि साधिकांना पू. आजींकडून शिकायला मिळालेली आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात मंडप घालण्याचे काम ‘सेवा’ म्हणून करणारे श्री. बाबली कळंगुटकर !

‘मी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमात ४-५ वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त मंडप घालण्याची सेवा करतो. ‘मी ही सेवा न्यूनतम दरात कशी होईल ?’, हे पहातो; मात्र दुसरीकडे काम करतांना माझा व्यावहारिक दृष्टीकोन असतो.

प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

प.पू. दास महाराज आणि पू. माई म्हणजे प्रेमाचा वहाता झराच आहे. शारीरिकदृष्ट्या त्यांचे पाय कमकुवत आहेत, तरीही त्यांचा देवाप्रती भाव असल्याने ते देवाला साष्टांग नमस्कार करतात.

तमिळनाडूमध्ये देवदर्शनाला गेल्यानंतर सौ. सायली करंदीकर यांना आणि त्यांचे पती श्री. सिद्धेश करंदीकर यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् तिरुपति आहेत’, याची मिळालेली प्रचीती

श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूमधील देवळांच्या दर्शनांसाठी बोलावले होते. तेव्हा आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात या प्रयोगातील काही साधकांच्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.

प.पू. दास महाराज – दास्यभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण !

वाईट शक्तींनी महाराजांवर अनेक प्राणघातक आक्रमणे केली. महाराजांनी ती परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतच यशस्वीपणे परतून लावली. ते पाहून ‘त्रेतायुगात मारुतीने श्रीरामाची सेवा कशी केली असेल !’, याची प्रचीती आली.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

१७  डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात ‘तमिळनाडू येथे दर्शन घेतलेली स्थाने आणि देवळांची भव्यता’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी वेळोवेळी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर मला अध्यात्माच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्याचा अमूल्य लाभ झाला. हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याविषयी ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता.’ – कु. डायना परेझ, व्हेनेझुएला