महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कुमारी) तेजल अशोक पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
दत्तगुरु ही पूर्वज, तसेच वाईट शक्ती यांच्या त्रासांपासून मुक्ती देणारी देवता आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसलेले साधक यांना सप्टेंबर २०२० मध्ये पितृपक्षाच्या कालावधीत हा नामजप ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात या प्रयोगातील काही साधकांच्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/536250.html
आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती
त्रासदायक अनुभूती
१. ‘नामजपाशी सूक्ष्म युद्ध करण्यासाठी आम्हाला त्रास देणार्या वाईट शक्ती घोगर्या आवाजात, अयोग्य उच्चार करून आणि वेड्यावाकड्या लयीत मस्करी करत बोलत होत्या.
२. वातानुकूलन यंत्रे चालू असूनही या जपातील मारकतेमुळे मला उष्मा जाणवत होता.
चांगल्या अनुभूती
१. या वेळी ‘प्रयोग ज्या ठिकाणी घेण्यात आला, तेथून पिवळ्या आणि लाल या रंगांचे किरण सर्व दिशांना सर्वत्र पोचल्याने पितृपक्षात पृथ्वीच्या जवळ आलेल्या सर्व पितरांवर या किरणांचा सकारात्मक परिणाम होत आहे’, असे मला जाणवले.
२. ‘पितरांच्या त्रासांपासून प्रत्येकाच्या स्थितीनुसार त्याचे संरक्षणही होत आहे’, असे मला जाणवले.
३. ‘या नामजपाने वायूमंडलाची शुद्धी होणार असून यामुळे पितरलोक आणि मर्त्यलोक (पृथ्वी) यांतील वातावरणातही पालट होणार आहेत’, असे मला वाटले.’
आध्यात्मिक त्रास असलेला एक साधक
त्रासदायक अनुभूती
१. ‘जप चालू झाल्यावर अनुमाने ३० मिनिटांनी अकस्मात् माझ्या दोन्ही हातांच्या मागच्या बाजूला आणि मनगटांवर लहान लाल फोड आले अन् तेथे पुष्कळ कंड येऊ लागली.
२. प्रयोगाच्या वेळी त्या फोडांचे आकार आणि त्यांमुळे येणारी कंड यांत वाढ झाली.
३. जप संपल्यावर मला येणारी कंड नाहीशी झाली आणि फोडांचा लालसरपणाही न्यून झाला.’ (‘साधकाला पूर्वजांचा त्रास आहे.’ – संकलक)
आध्यात्मिक त्रास असलेली आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेली साधिका
एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
चांगली अनुभूती
‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर मला दत्तगुरूंचे दर्शन झाले. त्यांनी त्यांच्या कमंडलूतील जल माझ्या शरिरावर शिंपडले. त्यांनी त्यांच्या झोळीतून काहीतरी काढून ते माझ्या तोंडात घातले. नंतर मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. त्यानंतर प्रथमच माझ्याकडून ‘वाईट शक्तींपासून माझे रक्षण होऊ दे’, अशी प्रार्थना झाली.’
आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांना आलेल्या चांगल्या अनुभूती
श्रीमती सुरेखा सरसर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘रामनाथी आश्रमाभोवती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे मंडल गोलाकार फिरत आहे’, असे मला दिसले. ‘वाईट शक्तींच्या आक्रमणापासून आश्रमाचे रक्षण व्हावे’, यासाठी दत्तगुरु आश्रमाभोवती संरक्षककवच निर्माण करत आहेत’, असे मला जाणवले.’
आध्यात्मिक त्रास नसलेले आणि आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असलेले साधक
श्री. मनोज नारायण कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘दत्तात्रेयांच्या त्रिशुळाच्या टोकातून माझ्यावर पांढरा प्रकाश पडत आहे’, असे मला जाणवले.
२. मला दत्तगुरूंच्या अनाहतचक्रावर पांढरा प्रकाश दिसला.
३. ‘काही कावळे दत्तगुरूंच्या अनाहतचक्रात विलीन होत आहेत’, असे मला दिसले. (‘पितृपक्षात पूर्वज कावळ्यांच्या माध्यमातून वासना पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांची तृप्ती झाल्यावर ते पुन्हा त्यांच्या लोकात जातात. दत्तगुरु हे पूर्वजांना गती देणारे असल्याने साधकाला ते पूर्वज कावळ्यांच्या रूपात दत्तगुरूंच्या अनाहतचक्रात विलीन होतांना दिसले.’ – संकलक)
४. हा नामजप ऐकतांना मला ‘काळे ढग पांढर्या प्रकाशात अदृश्य होत आहेत’, असे दिसले.
५. मला जगाचे मानचित्र (नकाशा) दिसले. ‘त्यातील भारताचे मानचित्र चैतन्याच्या कणांनी भरले असून त्या मानचित्रावर परात्पर गुरु डॉ. आठवले हातात सुदर्शनचक्र घेऊन उभे आहेत’, असे मला दिसले.
६. नामजप ऐकतांना मला प्रथम निळा, नंतर लाल आणि गुलाबी रंगाचा प्रकाश दिसून पुष्कळ हलकेपणा जाणवला.’
कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘माझ्या स्वाधिष्ठानचक्र ते विशुद्धाचक्रापर्यंत आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.
२. प्रयोगानंतर माझ्या तळहातांवर अनेक दैवी कण दिसले.’
आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘मला अनुक्रमे आज्ञाचक्र, अनाहतचक्र, मणिपूरचक्र, स्वाधिष्ठानचक्र आणि मूलाधारचक्र, या चक्रांच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. मला सहस्रारचक्राच्या ठिकाणीही संवेदना जाणवल्या. मला या चक्रांच्या ठिकाणी थंडपणा जाणवला.
२. नामजपाचा कालावधी संपल्यावरही चक्रांच्या ठिकाणी जाणवणारा थंडपणा कायम होता.’
(समाप्त)
– सुश्री (कुमारी) तेजल अशोक पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संगीत समन्वयक, फोंडा, गोवा. (१२.१२.२०२१)
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’वर उपलब्ध आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. या नामजपाविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करा : https://www.sanatan.org/Chaitanyavani हा नामजप ऐकतांना आपणास काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास ‘[email protected]’ या संगणकीय पत्त्यावर आम्हाला अवश्य कळवा.’ |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यामागे कार्यरत असलेला संकल्प !‘जगभरातील साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकर दूर व्हावेत, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्हावा’, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक नामजपांची निर्मिती करवून घेतली आहे. यात त्यांचा अप्रत्यक्ष संकल्पच कार्यरत झाला असल्याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्यास त्यांचे त्रास दूर होण्यास, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यास निश्चितच साहाय्य होईल.’ – सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संगीत समन्वयक, फोंडा, गोवा.(१२.१२.२०२१) |
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |