साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !
‘सनातनच्या साधकांसाठी ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून जणू ‘गुरुदेवांचे संदेशपत्र’च आहे. ‘सनातन प्रभात’मधून साधकांना साधनेची दिशा मिळते, त्यासमवेत साधनेतील अडथळ्यांवर उपाय, तसेच भाववृद्धीचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शनही मिळते.