श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवांतील दंगलींना हिंदूंच कारणीभूत असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा कांगावा !
मुंबई, २३ एप्रिल (वार्ता.) – ज्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचे, ज्याच्या डोळ्यांत प्रेम दिसायचे, तो अचानक उग्र का झाला आहे ? उग्र रूप धारण करणारी रामाची रचना कुणी केली ? राम सूडबुद्धीने पहात आहे, हे पोस्टर कोण लावते ? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवांत देशात झालेल्या दंगलींना अप्रत्यक्षपणे हिंदूंना दोषी ठरवले आहे. ‘ए.एन्.आय्.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आव्हाड यांनी वरील वक्तव्य केले आहे. हा व्हिडिओ आव्हाड यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वरून प्रसारित केला आहे.
माझ्या मनातला राम आणि हनुमान
हे वास्तव नकबुल असेल तर सोडून द्यावे #रामराम pic.twitter.com/tUEsmtkzAs— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 23, 2023
श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या उत्सवांवर आक्रमण करणार्या धर्मांधांविषयी तोंडातून एकही शब्द न काढता या व्हिडिओमध्ये हिंदूंना उपदेश करतांना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, राम नीलवर्णीय, प्रेमळ म्हणून ओळखला जातो. हे सर्व आम्ही विसरायचे का ? बिहार, बंगाल येथे काय झाले ? मागील १० वर्षांचा इतिहासात रामनवमी आणि हनुमान जयंती या वेळी असा विचित्र प्रकार झाला नाही. अचानक असे झाले, यामागील कारण पडताळला पाहिजे.
Video : “मी माझ्या वक्तव्यावर ठाम असतो”, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राम पाहण्याची दृष्टी…”https://t.co/9uVwdh8pVQ
— LoksattaLive (@LoksattaLive) April 23, 2023
रामाला पहाण्याची दृष्टी का पालटली ? आई-वडिलांचे ऐकणारा राम, आदिवासी स्त्री शबरी हिच्याकडून बोरे खाणारा राम, संघटनकौशल्य असलेला राम अशी रामाची ओळख होती. आमच्या बालपणी रामाचा जन्मोत्सव हसत खेळत साजरा व्हायचा. आपल्या लहानपणीच्या रामाचे चित्र पहा आणि आताच्या रामाचे चित्र बघा. हा दृष्टीतील पालट आहे. ज्याच्या डोळ्यांत प्रेम दिसायचे, तो अचानक उग्र का झाला आहे ? तुम्ही राम पालटला आहे.
संपादकीय भूमिका
|