कोल्हापूर विमानतळाच्या नूतन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण !

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलच्या लोर्कापणप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित विविध मान्यवर

कोल्हापूर – देशात ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९ सहस्र ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय करून १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कोल्हापूरचा समावेश असून या नवीन प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण (ऑनलाईन) स्वरूपात करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पहाणी करून ‘हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल’, असे मत व्यक्त केले.