पुणे येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामातील आग सतर्क यंत्रणेतील बिघाडामुळे भोंगा वाजला !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील ‘भारतीय खाद्य गोदामा’च्या (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आग सतर्क यंत्रणेमध्ये (फायर अलार्म) तांत्रिक बिघाड होऊन भोंगा वाजण्यास प्रारंभ झाला. सुरक्षारक्षकांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली. अग्नीशमक बंब मागवण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितींमध्ये ‘आग सतर्क यंत्रणे’तील बिघाड दुरुस्त करण्यात आला. गोदामातील सर्व मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने कळवले आहे. भारतीय खाद्य गोदामामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यासाठी प्रथमस्तरीय पडताळणी झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत.