नागपूर येथील स्वयंभू टेकडी श्री गणेश स्थानाला ‘अ’ पर्यटन स्थळाचा दर्जा !

मुंबई – नागपूर शहरातील प्रसिद्ध आणि स्वयंभू श्री गणेश मंदिर स्थानाला ‘अ’ पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून ११ मार्च या दिवशी या विषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे. हे देवस्थान २०० वर्षांपासून असल्याचे मानले जाते. घरातील मंगलमय प्रसंग असो वा कोणता उत्सव असो नागपूरवासीय या टेकडीवर जाऊन श्री गणेशाचा आशीर्वाद घेतात. देशभरासह विदेशातीलही भाविक टेकडी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतात. विदेशातील भाविकही येथे दर्शनासाठी येतात. ‘अ’ पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे या परिसराच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होऊ शकेल.

शासन आदेश लिंक वर वाचा : 202403111630134623