साधक चांगली सेवा आणि साधना करत असल्यास त्यांना प्रसाद देऊन आध्यात्मिक ऊर्जा देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
‘६.३.२०२३ या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना एका सेवेविषयी निरोप दिला. त्या वेळी मी सांगितलेला निरोप ऐकून त्यांना अत्यानंद झाला. त्या वेळी ‘साक्षात् आदिशक्ती जगदंबेलाच आनंद झाला आहे’, असे मला वाटले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला दुसर्या दिवशी खाऊ म्हणून ‘पेढे’ पाठवले. तेव्हा मला त्याची चव पुष्कळ मधुर लागली…