१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला खाऊ देणे आणि साधिकेला त्यातील चैतन्याची प्रचीती येणे
१ अ. साधिकेने सेवेविषयी सांगितल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अत्यानंद होणे : ‘६.३.२०२३ या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना एका सेवेविषयी निरोप दिला. त्या वेळी मी सांगितलेला निरोप ऐकून त्यांना अत्यानंद झाला. त्या मला म्हणाल्या, ‘‘मला फार समाधान वाटले आणि फार फार आनंद झाला.’’
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे बोलणे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी ‘साक्षात् आदिशक्ती जगदंबेलाच आनंद झाला आहे’, असे मला वाटले.
१ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला दुसर्या दिवशी खाऊ म्हणून ‘पेढे’ पाठवले. मी त्यांनी दिलेला प्रसाद खाल्ला. तेव्हा मला त्याची चव पुष्कळ मधुर लागली. तेव्हा मला वाटले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला कुशीत घेतले आहे.’
१ ई. संत आणि साधक देत असलेला खाऊ (प्रसाद)
१ ई १. संत आणि साधक देत असलेला खाऊ (प्रसाद) चैतन्यमय असणे आणि त्यातून साधकांना साधना करण्यासाठी बळ अन् ऊर्जा मिळत असणे : आपली व्यवहारात पदोन्नती झाल्यास आपले मित्र आणि कुटुंबीय आपल्याला प्रेमाने पेढे देतात; मात्र त्या खाऊमुळे आपल्याला क्षणिक सुख मिळते. आश्रमात संत आणि साधक यांनी आपल्याला खाऊ दिल्यावर आपल्याला तो प्रसादाप्रमाणे वाटतो अन् त्या खाऊमुळे आपल्याला साधनेसाठी ऊर्जा आणि बळ मिळते.
१ ई २. ‘संत आणि साधक यांनी दिलेल्या खाऊची तुलना आपण व्यवहारात मिळालेल्या खाऊशी करूच शकत नाही’, असे मला वाटले.
माझ्या मनात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव दाटून आला.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (९.३.२०२३)