प्रभादेवी (मुंबई) येथे महागड्या विदेशी मद्याचा साठा जप्‍त

दोघांना अटक !

मुंबई – परराज्‍यातून आणलेल्‍या अनेक महागड्या विदेशी मद्याचा साठा प्रभादेवी येथे जप्‍त करण्‍यात आला. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या पथकाने ही कारवाई केली असून जाफर शेख आणि दिग्‍विजयसिंग जडेजा यांना अटक करण्‍यात आली आहे. यात १८ लाख ७५ सहस्र ७६० सहस्र किमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे. या तस्‍करीत आणखी कुणाचा सहभाग आहे का ? याची चौकशी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

विदेशी मद्याची तस्‍करी करणार्‍यांना कठोर शिक्षा दिल्‍याविना हे प्रकार थांबणार नाहीत !