सातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागातील पेठ शिवापूर येथील अनधिकृत मदरशाला अनेक ग्रामपंचायतींचा विरोध आहे. याविषयीचे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या ग्रामसभेमध्ये घेतले आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे मोरगिरी विभागातील जनमानसामध्ये असंतोष वाढत आहे.
पेठ शिवापूर येथील ५ गुंठे परिसरात उभा रहात असलेला अनधिकृत मदरसा येथील नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. हे सूत्र लक्षात घेऊन मोरगिरी विभागातील मोरगिरी, कोकीसरे, वाडी कोतवडे, आंब्रज, माणगाव, नेरळे, गोकुळ, महिंद, डोंगळेवाडी आदी ग्रामपंचायतींनी अनधिकृत मदरशाविरोधात ठराव संमत केले आहेत. सर्वच ग्रामपंचायतींनी या मदरशाला विरोध दर्शवून भविष्यातील अप्रिय घटना घडण्याची कल्पना दिली आहे.
अनधिकृत मदरशाविषयी पंचक्रोशीतील ग्रामपंचायती ठराव घेत असतांना ठरावाची योग्य ती नोंद घेण्याऐवजी ‘चौकशी करू, नंतर पाहू’, असे धोरण जिल्हा प्रशासनाकडून अवलंबले आहे.
संपादकीय भूमिका
|