परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगामुळे झालेले गुणवर्धन आणि त्‍यांच्‍या अविस्‍मरणीय सत्‍संगातील काही सुखद आठवणींचे स्‍मरण

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा स्‍थुलातून सत्‍संग लाभूनही त्‍यांचा ‘प्रीती’ हा गुण आत्‍मसात करता न येणे आणि त्‍यांनी प्रामुख्‍याने प्रेमभाव वाढवण्‍यासाठी प्रयत्न करण्‍यास सांगणे

श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्‍या हृदयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या कालावधीत त्‍यांना जाणवलेली सूत्रे अन् गुरुकृपेने आलेल्‍या अनुभूती !

‘माझ्‍या हृदयाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचे ठरल्‍यानंतर जेव्‍हा जेव्‍हा आश्रमातील भोजनकक्षात माझी सद़्‍गुरु राजेंद्रदादांशी भेट व्‍हायची, तेव्‍हा ते माझी प्रेमपूर्वक चौकशी करायचे. त्‍या वेळी त्‍यांना त्रासानुरूप नामजपादी उपाय विचारल्‍यावर ते लगेच उपायही सांगायचे.

लवकरच संत श्री बाळूमामा मंदिरात (आदमापूर) २४ घंटे ‘ऑनलाईन’ दर्शन चालू करणार ! – शिवराज नाईकवाडे, प्रशासक

या मंदिराचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे हे मंदिर २४ घंटे भाविकांसाठी उघडे असते. ‘श्री महालक्ष्मीदेवीच्‍या कृपाछत्राखाली राहिल्‍यानंतर आता संत श्री बाळूमामा यांनीच मला येथे बोलावून घेतले’, अशी माझी श्रद्धा आहे. त्‍यामुळे भाविकांना ज्‍या सर्व सुविधा देणे अपेक्षित आहे, त्‍या सर्व सुविधा देण्‍याचा माझा प्रयत्न आहे.