गोवा येथील सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्याविषयी त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. शेखर आगरवाडेकर, म्हापसा.
१ अ. ‘सौ. मीनाक्षीताईंची स्मरणशक्ती उत्तम आहे.
१ आ. मनमोकळेपणा : त्यांच्या सहज वागण्यामुळे ‘त्या आपल्या कुटुंबातीलच आहेत’, असे वाटते. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते.
१ इ. अचूक निरीक्षणक्षमता : वर्ष २०१८ मध्ये सौ. मीनाक्षीताई म्हापसा येथे सेवेसाठी यायच्या. त्यांचे साधकांच्या संदर्भातील निरीक्षण अचूक असायचे. त्यांना कधी भ्रमणभाष करून सेवेत येणारी अडचण सांगितली, तर त्या संबंधित साधकाविषयी अचूकपणे सांगायच्या. त्यामुळे पुढे गुरुकार्याची हानी होत नसे.
१ ई. त्या सेवेसाठी सतत तत्पर असतात.’
२. सौ. मनाली भाटकर, फोंडा, गोवा.
२ अ. मनमोकळेपणा : ‘सौ. मीनाक्षीताई साधकांविषयी त्यांच्या मनात आलेले विचार मनमोकळेपणाने सांगतात.
२ आ. नियोजन कौशल्य : त्या त्यांच्या वेळेचे व्यवस्थित नियोजन करतात. त्या ‘त्यांचा वेळ कुठेही वाया जाणार नाही’, असा प्रयत्न करतात. त्यांनी घरातील कामे, व्यष्टी साधना आणि सेवा यांचा चांगला मेळ घातला आहे.
२ इ. इतरांना साहाय्य करणे : त्या साधकांना ‘त्यांनी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, हे सांगून साधना अणि सेवा यांसाठी साहाय्य करतात.
२ ई. त्या व्यष्टी साधना पूर्ण करून त्याचा प्रतिदिन आढावा देतात.
२ उ. सतत सेवारत रहाणे : घरामध्ये कितीही अडचणी असल्या, तरी त्या सेवा परिपूर्णच करतात. त्यांनी मुलाचे लग्न आणि त्यानंतर सुनेचे बाळंतपण हे सर्व सांभाळून सेवाही व्यवस्थित केली. तेव्हाही त्यांनी कुठेही सवलत घेतली नाही.
२ ऊ . जाणवलेला पालट : पूर्वी त्यांना साधकांकडून अपेक्षा असायच्या; परंतु आता त्या न्यून झाल्या आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३.८.२०२१)