‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’चे घेतलेले दर्शन आणि आलेले अनुभव

सप्तमोक्षनगरींपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र काशीचे हिंदु जीवनदर्शनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडेच तेथे भगवान काशीविश्वनाथाचे दर्शन घेण्याचा सुयोग जुळून आला. या निमित्ताने ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’चे दर्शन घडले, त्याचे अनुभव सांगणारा हा लेख…

हिंदु सणांच्या काळात उगवणारे कथित पर्यावरणवादी !

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपकाचा त्रास होतो म्हणणारे आणि तेव्हाच ध्वनीप्रदूषण आठवणारे वर्षभर मशिदींवरील लाऊडस्पीकरमधून कानठळ्या बसवणार्‍या अजानला ते जणू अंगाईगीतच मानतात. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाने अजिबात ध्वनीप्रदूषण होत नाही, हे मोठे आश्चर्यच आहे !

बलात्कार आणि हत्या यांप्रकरणी जन्मठेप झालेल्यांची शिक्षा माफ करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोध्रा (गुजरात) येथे वर्ष २००२ च्या दंगलीच्या काळात बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि त्या परिवारातील  ७ जणांची हत्या यांप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका करण्यात आली. गुजरातमधील भाजप सरकारने त्याच्या ‘क्षमा धोरणा’च्या अंतर्गत या ११ जणांच्या सुटकेला संमती दिली.

स्वतःच्याच माजी राष्ट्राध्यक्षांच्या पारपत्रांची चोरी करणारी अमेरिका !

‘मार-ए-लागो’ या ‘रिसॉर्ट’वरील धाडीच्या वेळी ‘फेडरेशन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (‘एफ्.बी.आय.’ने) माझी ३ पारपत्रे चोरली. त्यांपैकी एकाची मुदत संपली होती. राजकीय प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करण्याचा हा सर्वांत वाईट स्तर आहे’, अशी टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.’

सामाजिक माध्यमांना ज्या बातम्या कळतात, त्या पोलिसांना का कळत नाहीत ?

‘१२ ऑगस्ट २०२२ या दिवशी उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे सलमान नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा ध्वज फडकावल्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.’

साधकांनो, राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्यास इच्छुक धर्मप्रेमी आणि साधक यांच्या सेवांचे तत्परतेने नियोजन करून समष्टी साधनेची हानी टाळा !

एक धर्मप्रेमी कामाच्या निमित्ताने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात गेले होते. तेथे गेल्यावर त्यांनी त्या जिल्ह्यातील स्थानिक साधकांना संपर्क केला आणि त्यांना राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी करून घेण्यास सांगितले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर या दैवी बालसाधिकेच्या लिखाणाच्या वह्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्ये नकारात्मक स्पंदने आढळण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

कु. अपाला औंधकर या दैवी बालसाधिकेच्या लिखाणाच्या वह्यांचा ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाचा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या लिखाणाच्या वह्यांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असण्यामागील आध्यात्मिक कारण येथे दिले आहे.

सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे लाभदायक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाचा निष्कर्ष श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर ! महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक ! फोंडा (गोवा) – जागतिक स्तरावर आपण अयोग्य वारसास्थळांचा प्रसार करत आहोत. आपण सकारात्मक प्रभावळ असलेली … Read more

मनुष्याला रात्री वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

पृथ्वीवरील ज्या भूभागांवर सूर्यप्रकाश पडतो, त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ सूर्याचा वातावरणावरील परिणाम सूक्ष्म रूपाने टिकून असतो; कारण सूर्यप्रकाशात दैवी अस्तित्व असते. त्यामुळे सूक्ष्मातील वाईट शक्तींना सूर्यप्रकाश असलेल्या भूभागांवर कार्य करणे कठीण जाते.

विभूती लावल्यावर व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा घटणे, सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढणे आणि विभूतीचा परिणाम न्यूनतम ३० मिनिटे टिकून रहाणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘विविध धार्मिक विधींच्या अंतर्गत औदुंबर, बेल, अश्वत्थ या वृक्षांच्या समिधा, तसेच तूप, मध आदी सात्त्विक द्रव्यांचे हवन (विशिष्ट मंत्र म्हणून देवतांसाठी द्रव्य अग्नीत अर्पण करणे) केले जाते. हवनानंतर हवनकुंडातील विभूती आज्ञाचक्रावर (दोन भुवयांच्या मध्ये) लावतात. ‘विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने ती लावणार्‍याला काय लाभ होतो … Read more