६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर या दैवी बालसाधिकेच्या लिखाणाच्या वह्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्ये नकारात्मक स्पंदने आढळण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

‘२७.३.२०२२ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) या दैवी बालसाधिकेच्या लिखाणाच्या वह्यांचा ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाचा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या लेखामध्ये तिच्या लिखाणाच्या वह्यांमधून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे संशोधनातून आढळले. त्याचप्रमाणे तिने या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी तिला दिलेली उत्तरे संशोधनाच्या लेखात प्रसिद्ध झाली होती. तिने परात्पर गुरुदेवांना विचालेल्या प्रश्नांमध्ये तिची जिज्ञासू वृत्ती आणि सकारात्मकता जाणवत होती. यामागील आध्यात्मिक कारण येथे दिले आहे.

कु. अपाला औंधकर

कु. अपाला औंधकर हिने नृत्याविषयी मिळालेल्या ज्ञानाचे केलेले लिखाण

१. कु. अपाला या दैवी बालसाधिकेच्या लिखाणाच्या वह्यांमध्ये नकारात्मक स्पंदने जाणवण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

कु. अपाला ही उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालसाधिका आहे. तिच्या मनामध्ये भगवंताविषयी पुष्कळ भाव आहे. त्यामुळे तिने केलेल्या लिखाणामध्ये दैवी चैतन्य कार्यरत होऊन तिच्या लिखाणातून पुष्कळ प्रमाणात दैवी सुगंध वातावरणात दरवळतो. त्यामुळे तिने केलेले लिखाण वाचतांना साधकांचा भाव जागृत होतो. त्यामुळे तिच्या लिखाणाच्या वह्यांतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक ऊर्जेमुळे वातावरणाची शुद्धी होते. ‘कु. अपालाच्या लिखाणाच्या वह्यांचा आध्यात्मिक स्तरावर समष्टीला लाभ होऊ नये’, यासाठी ६ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी तिच्या लिखाणाच्या वह्यांवर समष्टी स्तरावर सूक्ष्मातून आक्रमण करून तिच्या लिखाणाच्या वह्यांवर मायावी शक्तीचे त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण निर्माण केले. त्यामुळे कु. अपालाने केलेल्या लिखाणाच्या वह्यांतून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदनांचे प्रक्षेपण झाले.

कु. मधुरा भोसले

२. कु. अपालाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिखाणातील वह्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळण्याविषयी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तिची जिज्ञासू वृत्ती आणि सकारात्मकता जाणवण्यामागील कार्यकारणभाव

कु. अपालामध्ये अहं अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे ती स्वत:ची प्रतिमा सांभाळत नसल्यामुळे तिने लिखाणाच्या वह्यांच्या संदर्भातील तिच्या मनातील प्रश्न परात्पर गुरुदेवांना प्रांजळपणे विचारले. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे तिने ‘स्वत:च्या लिखाणाच्या वह्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळणे’, ही वस्तूस्थिती सहजतेने स्वीकारली, तसेच तिच्यामध्ये शिकण्याची वृत्ती प्रबळ असल्यामुळे तिने परात्पर गुरुदेवांनी दिलेली उत्तरेही सहजतेने स्वीकारली. तिच्यातील प्रतिमा न जपणे आणि शिकण्याची वृत्ती प्रबळ असणे, या दोन प्रमुख गुणांमुळे ती सकारात्मक राहू शकली.

३. कु. अपालाच्या लिखाणाच्या वह्यांतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर होणारा परिणाम

४. कु. अपालाकडून शिकायला मिळालेले दैवी गुण

‘कु. अपालामधील वरील गुणांतून तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात साधकत्व असल्याचे जाणवते. या गुणांच्या आधारे तिच्यातील साधकत्वाचे रूपांतर शिष्यत्वात होऊन तिची संतपदाकडे शीघ्र गतीने वाटचाल चालू झालेली आहे’, असे वाटते. कु. अपालाचे चिंतनशील लिखाण, तिला आलेल्या अनुभूती आणि विविध प्रसंगांमध्ये आढळणारी तिची सहजस्थिती अन् शिकण्याची वृत्ती यांतून मला बरेच काही शिकायला मिळाले.

कृतज्ञता

‘हे गुरुमाऊली, तुम्ही मला दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर हिच्या माध्यमातून अध्यात्म कसे जगायचे’, हे शिकवत आहात, यासाठी मी आपल्या सुकोमल चरणी कोटीश: वंदन करून कृतज्ञता व्यक्त करते.’ (१.४.२०२२)

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंतया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक