साहाय्याच्या प्रतीक्षेतील ६ मास !

शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सोबत सुयोग्य नियोजन आणि शासकीय योजनांची प्रभावीपणे कार्यवाही आवश्यक आहे. तरच अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपून त्यांना सुखाचे दिवस येतील, असे म्हणावे लागेल.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीदत्त जन्मोत्सवाची सिद्धता पूर्ण !

श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीदत्त जन्मोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली असून सातारा जिल्ह्यातील दत्त भक्तांच्या दिंड्या आणि पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत. श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १६ डिसेंबरपासून श्रीदत्तजयंती उत्सवास प्रारंभ होत आहे.

पोलिसांच्या चेतावणीला न जुमानणार्‍यांवर कारवाई करा !

कोलार (कर्नाटक) येथे पोलिसांनी चेतावणी देऊनही ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या घरांमध्ये जाऊन ख्रिस्ती धार्मिक पुस्तके वाटण्याचा प्रयत्न झाल्याने लोकांकडून ती जाळण्यात आली.

इंग्रजी भाषेखेरीज हिंदी आणि संस्कृत या भाषांचा स्वीकार केल्यानेही देश विकसित होऊ शकतो !

‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’

आजच्या काळात भगवद्गीतेचे महत्त्व !

प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा स्थित असूनही आम्ही जाती, वर्णभेद विसरू शकत नाही. अटळ दुःख सहन करण्याची शक्ती हे मनोबल गीतेने समाजाला दिले.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

‘हिंदु धर्माचा अपमान : मुनव्वर फारूकीचे स्वातंत्र्य ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद

‘माझेच गुरु श्रेष्ठ आहेत !’, असे म्हणणे हा शिष्याचा आत्मकेंद्रितपणा आणि अहंकार होय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन

आश्रम हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक स्थान ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

‘‘आश्रम म्हणजे केवळ आश्रमाच्या भिंती नाहीत, तर प्रत्येक साधक म्हणजे आश्रमाचे प्रतिबिंब आहे. असा साधक घरी असला, तरी तो आश्रमात असल्याप्रमाणे वागतो.’’

साधनेची तीव्र तळमळ आणि प.पू. गुरुदेवांवर अढळ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वाराणसी येथील श्रीमती दुर्गा हरिकिशोर चौबे (वय ६२ वर्षे) !

आई माझ्याशी भ्रमणभाषवर केवळ साधनेच्या प्रयत्नांविषयीच बोलते. ‘ती साधनेत कुठे न्यून पडते ?’, याचा ती मला आढावा देते. ‘माझ्याकडून इतरांप्रमाणे अधिक सेवा होत नाही. मी प.पू. गुरुदेवांना कसे प्रसन्न करून घेऊ ?’, असे ती मला विचारते.