कोल्हापुरात शिवसेनेने कन्नड रक्षण वेदीकेचा ध्वज जाळला !

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात कन्नड रक्षण वेदीकेचा ध्वज जाळण्यात आला.

चारही वेदांचा मराठीत अनुवाद करण्याचे महत्कार्य करणारे डोंबिवली येथील वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे देहावसान !

त्यांच्या पश्चात् मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वर्ष २०२१ मध्येच त्यांनी केलेल्या वेदाभ्यासाविषयी त्यांना ‘डॉक्टरेट’ पदवी देण्यात आली होती.

मंत्रालयात विनामास्क वावरणारे आमदार मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी ठोठावला दंड !

मंत्रालयात विनामास्क वावरणारे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला. मंत्रालयाच्या बाहेर पडतांना आमदार चव्हाण यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता.

राजापूर (रत्नागिरी) येथील ‘दांडे-अणसुरे’ पुलाची दुरुस्ती तातडीने करा ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ मोहिमेच्या अंतर्गत पत्रकार परिषद आणि प्रशासनाला निवेदन सादर

आमदार चर्चिल आलेमाव यांना अपात्र ठरवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सभापतींकडे मागणी

आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केल्याचे प्रकरण

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. नैवेद्या वैती हिने मुंबई जिल्हास्तरीय ‘तायक्वांडो क्योरूगी’ स्पर्धेत पटकावले रजतपदक !

कु. नैवेद्याने मुंबई जिल्हास्तरीय ‘तायक्वांडो क्योरूगी’ स्पर्धेत २० किलो वजनाच्या गटात तिने हे प्राविण्य दाखवले.

मुंबईत ३ ठिकाणांहून ८ किलो अमली पदार्थ कह्यात

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.) १३ डिसेंबर या दिवशी ३ ठिकाणी धाडी टाकून ८ किलो अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ गुप्तचर विभागाने मागील आठवड्यात आफ्रिकी महिलेकडून……

हिंदु जनजागृती समितीची ‘हलाल सर्टिफिकेशन’ विषयीची जागृती कौतुकास्पद ! – पू. कालीचरण महाराज

हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल सर्टिफिकेशन’ विषयी चालवलेली जागृती कौतुकास्पद आहे. अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही याला पाठिंबा दर्शवून हिंदूंमध्ये जागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन अकोला येथील कालीपुत्र पू. कालीचरण महाराज यांनी केले.

जगात माणसांवर आलेले संकट आणखी २ वर्षे राहील !

आगामी वर्षात ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी पाऊस पडेल. जनावरांच्या चार्‍यांची सोय होईल. पिवळ्या रंगाच्या वस्तूंना महागाई राहील, आषाढ मासात १५ दिवस अगोदर पाऊस लांबणार आहे. जगात माणसांवर आलेले संकट आणखी २ वर्षे राहील.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् मेजवान्या करण्यावर प्रतिबंध आणावा.