
सातारा, १४ डिसेंबर (वार्ता.) – सध्या विविध जिहादांच्या माध्यमांतून धर्मांधांनी देशात उच्छाद मांडला आहे. देशात प्रतिदिन ४० सहस्रांहून अधिक हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल सर्टिफिकेशन’ विषयी चालवलेली जागृती कौतुकास्पद आहे. अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही याला पाठिंबा दर्शवून हिंदूंमध्ये जागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन अकोला येथील कालीपुत्र पू. कालीचरण महाराज यांनी केले. सध्या पू. कालीचरण महाराज पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर असून त्यांचा मुक्काम सातारा जिल्ह्यात होता. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र सांभारे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापूरे यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते.
सनातनला सप्तर्षींचे आशीर्वाद ! – पू. कालीचरण महाराज
सनातनचे धर्मजागृतीचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून सूक्ष्म-जगताचा अभ्यासही विलक्षण आहे. सनातन संस्थेला साक्षात् सप्तर्षींचे आशीर्वाद आहेत. मीही सनातनचाच आहे. जो धर्माभिमानी हिंदु आहे, तो प्रत्येक जण सनातनचाच आहे. आपल्यासमवेत साक्षात् भगवंताचे आशीर्वाद असतांना आपण कशासाठी कुणाला घाबरायचे ?
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव