
कोल्हापूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात कन्नड रक्षण वेदीकेचा ध्वज जाळण्यात आला. या वेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, ‘‘ही घटना कर्नाटक राज्य सरकार पुरस्कृत आहे. यापुढे कर्नाटकचे असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.’’ या प्रसंगी विजय देवणे, अवधूत साळोखे, सुशांत देसाई, विनोद खोत, रणजित आयरेकर यांसह अन्य उपस्थित होते.
बेळगाव बंदला शहर आणि ग्रामीण भागात प्रतिसाद !
बेळगाव – दीपक दळवी यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १४ डिसेंबर या दिवशी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहर आणि ग्रामीण भागात प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, तसेच ग्रामीण भागातील बस बंद ठेवण्यात आल्या होत्या.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !