अशा प्रकारची कर्तव्यदक्षता पोलिसांनी सर्वत्र दाखवावी !- संपादक
मुंबई – मंत्रालयात विनामास्क वावरणारे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला. मंत्रालयाच्या बाहेर पडतांना आमदार चव्हाण यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. राज्यात ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कोरोनाविषयीच्या नियमांची कारवाई कडक करण्यात आली आहे.