यवतमाळ येथे नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कचरा टाकला !

कचरा प्रश्‍नांकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाची चेतावणी

शहरातील कचरा प्रश्‍नाशी संबंधित चालू असणारा भोंगळ कारभार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी केला जाणारा खेळच !

यवतमाळ, १४ जून (वार्ता.) – येथील नगरपालिकेने कचरा उचलण्याचे नवीन कंत्राट काढण्याचा ठराव जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी पाठवला; मात्र त्यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. स्वच्छता कामगारांचे वेतन थांबल्याने कचर्‍याच्या गाड्याही बंद आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. काही नगरसेवक स्वव्ययातून कचरा उचलत आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी नगरसेवकांनी दिली आहे. तसेच यासह काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कचरा टाकत आपला निषेधही नोंदवला आहे.