‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘स्मार्टफोन’ न मिळाल्याने नैराश्यातून एकोशी (गोवा) येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !

मानखुर्द (मुंबई) येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा ! – विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

न्यायालयाच्या निर्देशानुसार मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढण्याऐवजी पोलिसांनी कु. करिश्मा भोसले यांच्या आईला भा.द.वि.च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली.

मानाच्या पालख्यांसह मोजक्या वारकर्‍यांचे पंढरपूर येथे आगमन

मानाच्या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पंढरपूर येथे आल्या. प्रत्येक पालखीसमवेत २० मानाचे वारकरी आले होते.

ठाणे येथील कु. ईशान कौसडीकर (वय ७ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित बघणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा ठाणे येथील कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला आहे.

येणार्‍या काळात एन्.जी.ओ.ना मोठ्या संधी असणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

केंद्रशासनाने घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामध्ये एन्.जी.ओ.ना (स्वयंसेवी संस्था) मोठ्या संधी असणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

ठाणे कारागृहातील कर्मचार्‍याला कोरोनाची लागण

ठाणे मध्यवर्ती कारागृहात २३ मे या दिवशी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ मासाने येथील एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

‘ज्येष्ठ अमावास्या, २१.६.२०२०, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे माजी संचालक आकार पटेल यांच्या विरोधात तक्रार

देशात धर्मांधांकडूनच हिंदूंवर आक्रमण केले जात आहे, हे माजी संपादकही असणार्‍या आकार पटेल यांना दिसत नाही, असे कसा म्हणता येईल ? पटेल यांच्यासारखे हिंदुद्वेषी निधर्मी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगामध्ये खोटी माहिती पसरवून भारताला अपकीर्त करत आहेत !