एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा किमान ३ दिवसाआड करण्याचा प्रयत्न ! – संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त

सध्या शहरात ४ ते ५ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही मासांमध्ये शहरात किमान ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल. शहराची लोकसंख्या वाढली असल्याने २६ नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन आहे.

१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदानंद कदम यांना याचिका सुधारण्यास मिळाली अनुमती !

अनिल परब यांच्या मुरुड येथील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी व्यावसायिक भागीदार आणि सहकारी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  जयघोषाने दुमदुमली सावंतवाडी !

‘‘यात्रेत हिंदूंनी दाखवलेला सहभाग विरोधक आणि सावरकर यांच्यावर टीका करणार्‍यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कुणीही स्वा. सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द काढण्याचे धाडस करणार नाही.’’

गोवा : कळंगुट-कांदोळी किनार्‍यावरील  अवैध शॅक्सना टाळे ठोकण्यास प्रारंभ

अनुज्ञप्ती न घेताच १६१ शॅक्स उभे राहीपर्यंत त्यावर कारवाई न करणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता कि शॅकवाल्यांशी साटेलोटे ?

#Exclusive : फोंडा (गोवा) येथील कदंब बसस्थानक : एक दुर्लक्षित वास्तू !

सरकारमधील १२ पैकी ४ मंत्री फोंडा तालुक्यातील आहेत. तरीही ‘फोंडा येथील कदंब बसस्थानक एक दुर्लक्षित वास्तू राहिली आहे.’ सरकार कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प उभारते; मात्र अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची डागडुजी करण्यात सरकारला रस का नसतो ?

पुणे येथील मिळकतधारकांना ४० टक्के सवलत देण्याचा आदेश न आल्याने मिळकत देयके देण्यास विलंब !

महापालिकेकडून वर्ष १९७० पासून मिळकतधारक स्वत: रहात असल्यास ४० टक्के सवलत दिली जाते. यामुळे महापालिकेची आर्थिक हानी होत असल्याने महालेखा परीक्षकांकडून (कॅग) आक्षेप नोंदवण्यात आला होता.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन पंचांच्या साक्षी !    

या प्रकरणी ३ एप्रिलला सरकार पक्षाच्या वतीने मुंबई येथील पंच विजयकुमार नार्वेकर, तर कोल्हापूर येथील पंच सुनील जाधव यांची साक्ष नोंदवण्यात आली.

हिंदु जनजागृती समिती आणि ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ यांच्या पुढाकारातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सिंहगडावर १ एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते. गडावरील कोंढाणेश्वर मंदिर, देव टाक, अमृतेश्वर मंदिर तसेच कल्याण दरवाजा तटबंदी, हत्ती तलाव, नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक…