गुढीपाडव्‍यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत

गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने  आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्‍यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्‍याविषयी सविस्‍तर माहिती दिली.

महाराष्‍ट्र राज्‍य मानवाधिकार आयोगातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

ही रिक्‍त पदे तातडीने भरून न्‍यायदानाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित !

ठाणे मनसे अध्‍यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्‍य्रात बंदी !

परिसर संवेदनशील का झाला, याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम हटवण्‍यास सांगणार्‍यांवरच कायद्याचा बडगा उगारण्‍यात येतो. हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात नेमके कसे असायला हवे ?, हे आता जनतेने ठरवायला हवे !

शासकीय कार्यालयांमध्‍ये नागरिकांसाठी वेळ निश्‍चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !

आठवडा, पंधरवडा किंवा मासातून ठराविक वेळ निश्‍चित करावा. शक्‍यतो दुपारी २.३० ते ३.३० ही समान वेळ असावी. या वेळेत शक्‍यतो दौर्‍यांचे नियोजन करण्‍यात येऊ नये, असे आदेशत म्‍हटले आहे.

सीरियातील तरुणीकडून नवी मुंबईतील एकाची फसवणूक !

त्‍या तरुणीने कधी कस्‍टम ड्युटी, कधी आयकर विभाग भरणा, तर कधी कस्‍टम सर्विस चार्जेस अशा प्रकारे पैशांची मागणी केली होती. सामाजिक संकेतस्‍थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

सातारा येथे राहुल गांधी यांच्‍या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या विरोधात सातारा येथे भाजपच्‍या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्‍यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर दरात १८ टक्‍क्‍यांची वाढ !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर दरात १८ टक्‍क्‍यांची वाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणार्‍यांना पथकरासाठी १८ टक्‍के अधिक रक्‍कम मोजावी लागेल.

वारी मार्गातील मुक्‍काम तळावर सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची वारकर्‍यांची मागणी !

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी महामार्गावर रस्‍ता रुंदीकरण आणि विकासकामांत मागील वर्षापासून वेग मंदावला आहे. सोहळ्‍याच्‍या कालावधीत पालखी मार्गावर उड्डाणपुलाच्‍या कामाजवळ सेवा रस्‍ता आणि मुक्‍कामाच्‍या तळावरील जागेत वारी चालू होण्‍यापूर्वी जलदगतीने सुविधा उपलब्‍ध होणे अपेक्षित ….

त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थानातील ‘व्‍हीआयपी पेड’ दर्शन बंद करा !

त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थान हे केंद्रीय संरक्षित स्‍मारक असल्‍यामुळे येथे चालू करण्‍यात आलेले ‘व्‍हीआयपी पेड’ दर्शन (पैसे घेऊन दिले जाणारे दर्शन) चुकीचे असून ते प्राचीन स्‍मारके आणि पुरातत्‍व स्‍थळे अन् अवशेष कायद्याच्‍या तरतुदींच्‍या विरोधात आहे.

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर २८ मार्चपासून स्‍थानिकांना पुन्‍हा पथकर माफी !

‘शिवापूर पथकरनाका हटाव कृती समिती’ने शिवापूर पथकरनाका स्‍थलांतरित करण्‍यासाठी २ एप्रिल या दिवशी बंद पुकारला होता; परंतु जिल्‍हाधिकार्‍यांसमवेत झालेल्‍या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्‍यात आले. स्‍थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवल्‍यानंतर त्‍यांना पथकर माफी होणार आहे.